JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / पुणे / Pune Fire: 18 निष्पापांचा बळी घेणारी आग अजूनही धुमसतीच, पाहा घटनास्थळाचे Latest Photos

Pune Fire: 18 निष्पापांचा बळी घेणारी आग अजूनही धुमसतीच, पाहा घटनास्थळाचे Latest Photos

पुण्यातील मुळशी तालुक्यामध्ये असणाऱ्या उरवडे याठिकाणी SVS Aqua Technologies कंपनीला लागलेल्या आगीत 15 महिलांसह एकूण 18 जणांनी जीव गमावला आहे. दरम्यान या कंपनीमध्ये लागलेली आग नियंत्रणात आणली असली तरी काही ठिकाणी अद्यापही काही भागात आग धुमसत आहे.

0112

अद्वैत मेहता, पुणे, 08 जून: पुण्यातील मुळशी तालुक्यामध्ये असणाऱ्या उरवडे याठिकाणी SVS Aqua Technologies कंपनीला लागलेल्या आगीत 15 महिलांसह एकूण 18 जणांनी जीव गमावला आहे. दरम्यान या कंपनीमध्ये लागलेली आग नियंत्रणात आणली असली तरी काही ठिकाणी अद्यापही काही भागात आग धुमसत आहे.

जाहिरात
0212

या आगीत 18 जणांचा होरपळून मृत्यू झाला, दरम्यान त्यांच्या मृतदेहांची ओळख पटवणंही कठीण होत आहे. त्यामुळे dna टेस्ट करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिली जाणार आहेत.

जाहिरात
0312

या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे. या अनपेक्षित घटनेमुळे अनेकांचे संसार काही क्षणातच उध्वस्त झाले आहेत.

जाहिरात
0412

कंपनीची इमारत आगीत जळून भस्मसात झाली असून घटनेच्या दुसऱ्या दिवशीही काही भागात आग धुमसत आहे

जाहिरात
0512

दरम्यान मंगळवारी सकाळी 9 च्या सुमारास राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे घटनास्थळी पोचणार आहेत

जाहिरात
0612

शिवाय मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

जाहिरात
0712

याठिकाणी जीवितहानीबरोबरच कंपनीचंही मोठं नुकसान झाल्याचं या फोटोंमधून स्पष्ट होत आहे.

जाहिरात
0812

केमिकल तयार करणाऱ्या या कंपनीमध्ये लागलेली आग पसरत गेली आणि त्यामुळं भीषण दुर्घटना घडल्यानं 18 जणांना प्राण गमवावे लागले आहेत.

जाहिरात
0912

या कंपनीमध्ये जवळपास 37 मजूर काम करत होते. त्यापैकी 18 मजूर मृत्यूमुखी पडले आहेत. इतर 19 जणांना वाचवण्यात यश आलं असून त्यांच्यापैकी काही जखमींवर उपचार सुरू आहेत.

जाहिरात
1012

अग्निशमन दलाचे 8 बंब घटनास्थळी दाखल झाले होते. त्याद्वारे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. कंपनीत अडकलेल्या मजुरांची सुटका करण्यासाटी JCB च्या साह्याने भिंती फोडून त्यांना बाहेर काढण्याचाही प्रयत्न करण्यात आला. तहसीलदार अभय चव्हाण यांनी याबाबत माहिती दिली आहे

जाहिरात
1112

या कंपनीमध्ये लागलेल्या आगीच्या कारणाचा शोध घेतला असता, पॅकिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टीकमुळं आग लागल्याचं समोर येत आहे. या प्लास्टीकमुळं आग लागली आणि काही वेळातच आग वाढत गेल्यानं तिच्यावर नियंत्रण मिळवणं शक्यच झालं नाही. कंपनीमध्ये वॉटर प्युरिफायरसाठीच्या केमिकलचं उत्पादन केलं जातं.

जाहिरात
1212

घटनास्थळाहून समोर आलेले हे फोटो आगीची दाहकता आणि त्यामुळे झालेलं नुकसान किती मोठं आहे हे स्पष्ट करत आहेत.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या