JOIN US
मराठी बातम्या / पुणे / Pune News : पुणेकर लय भारी, सायकलला जोडली वॉशिंग मशिन, व्यायाम करत धुवा कपडे, Video

Pune News : पुणेकर लय भारी, सायकलला जोडली वॉशिंग मशिन, व्यायाम करत धुवा कपडे, Video

पुणेकरानं सायकल चालवत कपडे धुण्याचं खास मशिन तयार केलंय. पाहा हे मशीन नेमकं कसं काम करतं

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

प्रियांका माळी, प्रतिनिधी पुणे, 13 जून : सध्याच्या काळात मुलं सातवी-आठवीला गेली की त्यांच्या हातात दुचाकी पडते. त्यामुळे सायकलिंगचा आनंद कमी होतोय. अनेक तरुण-तरुणी सायकल हौसेनं घेतात. पण, काही दिवसांनी ती धुळखात पडलेली असते. व्यायाम आणि सुदृढ आरोग्यासाठी सायकलिंग हा उत्तम पर्याय आहे. पुण्यातल्या एका तरुणानं याच गोष्टींचा विचार करून सायकलवर चालणारी चक्क वॉशिंग मशिन तयार केलीय. काय आहे संशोधन? पुण्याचे प्राध्यापक मंदार पाटील यांनी ही खास सायकल तयार केलीय. ही सायकल चालवतानाच तुमचे कपडे धुवून निणार आहेत. सायकलीचे पेडल जसं मारू तसे त्याला जोडलेल्या वॉशिंग मशिनमध्ये एकावर एक आपटले जातात आणि चांगले धुतले जातात. एका वेळी सात किलोपर्यंतचे कपडे धुणे शक्य आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली.

’ मी स्वत:  हॉस्टेलमध्ये राहिलो आहे. हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलांना कपडे धुण्याचा मोठा प्रश्न असतो. त्याचबरोबर ही मुलं कपडे धुताना एका वेळेस किमान पाच ते सहा बादल्या ( शंभर लिटरपेक्षा जास्त) पाणी वापरतात. तसंच ही मुलं नियमित व्यायाम करण्याचाही कंटाळा करतात. त्या मुलांना डोळ्यासमोर ठेवून ही सायकल तयार केली आहे. छोरी छोरोंसे कम नही’, बंदोबस्त करायला आल्या ‘लेडी बाऊन्सर’ असा तयार झाला ग्रुप! या सायकलमध्ये एक टँक लावण्यात आलाय. त्याचा दरवाजा उघडला की वॉशर आहे. या वॉशरमध्ये  कपडे, पावडर आणि पाणी टाकावे. त्यानंतर वॉशरचं झाकण लावलं की त्याला मॅग्नेट लॉक आहे.  त्यानंतर सायकलवर बसून हे मशीन फिरवलं की कपडे धुतले जातील. वॉशिंग मशिन प्रमाणेच याला इनलेट आणि ड्रेन आहे. पाण्याची लेव्हल कायम ठेवण्यासाठी एक वॉल देखील लावण्यात आलाय. सुमारे 10 ते 15 मिनिटामध्ये हे कपडे धुतले जातात. त्याचबरोबर कपडे ड्राय होण्याचं प्रमाण 80 टक्के आहे,’  असं पाटील यांनी सांगितलं. मंदार पाटील हे गेल्या 9 महिन्यांपासून या विषयावर संशोधन करत होतो. त्यांनी सिंहगड इन्स्टिट्यूचे विद्यार्थ्यांच्या मदतीनं तसंच अवसारी शासकीय तंत्रनिकेतन कॉलेजचे एचओडी डॉ. शेखर गजल यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या