pune lockdown news : पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे आज 3 एप्रिलपासून संध्याकाळी 6 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ही संचारबंदी (Mini lockdown) असणार आहे. पहिल्याच दिवशी कडक पालन करण्यात आले आहे (अद्वैत मेहता, प्रतिनिधी)
पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे आजपासून मिनी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तब्बल वर्षभरानंतर पुन्हा एकदा पुण्याचे रस्ते ओस पडले आहे. पुणेकरांनीही प्रशासनाच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन केल्याचे दिसून येत आहे.
नेहमी वर्दळीचा भाग असलेला पुणे लक्ष्मी रस्त्यावर संध्याकाळी 7 वाजेच्यानंतर शुकशुकाट पाहण्यास मिळाला.
पुणेकरांनी आपली दुकानं बंद ठेवून लॉकडाऊनला प्रतिसाद दिला आहे. संध्याकाळी 6 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ही संचारबंदी असणार आहे. आठवडाभरानंतर म्हणजे 9 एप्रिल, 2021 ला परिस्थितीचा पुन्हा आढावा घेऊन त्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाणार आहे.