JOIN US
मराठी बातम्या / पुणे / Tomato farming : टोमॅटो झाला डॉलरपेक्षा भारी अन् करोडपती झाला पुणेकर शेतकरी!

Tomato farming : टोमॅटो झाला डॉलरपेक्षा भारी अन् करोडपती झाला पुणेकर शेतकरी!

Tomato farming : सध्या बाजारात टॉमेटोने भाव खाल्ला असून शेतकरीही कधी नव्हे ते मालामाल झाले आहेत. जुन्नरमधील एक शेतकरी तर कोट्याधीश झाला आहे.

जाहिरात

करोडपती झाला पुणेकर शेतकरी!

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रायचंद शिंदे, प्रतिनिधी जुन्नर, 12 जुलै : कधी नव्हे ते शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव मिळत आहे. सध्या टोमॅटोने अख्ख मार्केट जाम केलंय. या टोमॅटोमुळे एका शेतकऱ्याचं नशीब पालटलं आहे. लॉटरीमधून कोट्यवधी झाल्याच्या अनेक बातम्या तुम्ही पाहिल्या किंवा वाचल्या असतील. मात्र, शेतात घाम गाळून पिकवलेल्या टोमॅटोच्या शेतीतून कोट्यधीश झालेल्या जुन्नरमधील एका शेतकऱ्याची यशोगाथा आज आपण पाहणार आहोत. पाचघर हे पुणे आणि नगर जिल्ह्यातील सीमेवर वसलेले हे छोटंसं गाव आहे. ग्रीन बेल्ट अशी जुन्नरची ओळख आहे. राज्यातील सर्वात जास्त धरणे याच तालुक्यात आहेत. यामुळे या गावचा कायापालट झाला. काळीभोर जमीन आणि वर्षभर पाणी. यामुळे येथे कांदा आणि टोमॅटोची शेती केली जाते. गावात जिकडे पाहावं तिकडे टोमॅटोची लागवड केलेली पाहायला मिळते. याचमुळे टोमॅटोने येथील अनेकांचं नशीब पालटले आहे. गायकर कुटुंब त्यापैकीच एक. पाचघरच्या  तुकाराम भागोजी गायकर यांची 18 एकर बागायती जमीन आहे. त्यातील 12 एकरवर त्यांनी त्यांचा मुलगा ईश्वर गायकर व सून सोनाली यांच्या मदतीने टोमॅटोची शेती केली. गायकर यांच्या टोमॅटोमुळे परिसरातील 100 पेक्षा जास्त महिलांना रोजगार मिळाला आहे. टोमॅटो बागेची मशागत, तोडणी, क्रेट भरणे, फवारणी आदींचे व्यवस्थापन त्यांची सुनबाई सोनाली गायकर करते तर मुलगा ईश्वर गायकर विक्री व्यवस्थापन व आर्थिक नियोजन करत आहेत. चांगला बाजार मिळाल्याने मागील 3 महिने केलेल्या कष्टाची चीज झाले आहे. वाचा - Ahmednagar News : दुष्काळी भागातील गाव बनलं टोमॅटोचं आगार, 200 एकरमध्ये केली विक्रमी लागवड, Video गायकर यांना यंदा टोमॅटो पिकाची लॉटरीच लागली आहे. मागील महिनाभरापासून आजपर्यंत त्यांनी 13 हजार टोमॅटो क्रेट विक्रीतून सव्वा कोटी पेक्षा जास्त रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. आज मंगळवार दिनांक 11 जुलै 2023 रोजी नारायणगाव त्यांच्या टोमॅटो क्रेटला 2100 रुपये (20 किलो क्रेट) भाव मिळाला आहे. गायकर यांनी आज एकूण 900 टोमॅटो क्रेट विक्री केली. आज एकाच दिवशी त्यांना तब्बल 18 लाख मिळालेत. मागील महिनाभरात त्यांना क्रेटला प्रतवारीनुसार 1000 ते 2400 रुपये भाव मिळाला आहे. गायकर यांच्यासारखे तालुक्यातील 10 ते 12 शेतकरी आहेत जे टोमॅटोमुळे ते कोट्यधीश झालेत. तर महिनाभरात बाजार समितीची तब्बल 80 कोटींची उलाढाल झाली आहे. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील उपबाजारात टोमॅटोला आज चांगल्या प्रतीच्या टोमॅटो क्रेटला (20 किलो ग्रॅम) उच्चांकी अडीच हजार रुपये म्हणजे 125 रुपये किलो रुपये भाव मिळाला. वाढलेल्या बाजारभावामुळे अनेक टोमॅटो उत्पादक लखपती बनले आहेत. तर अनेकजण कोट्यधीश झालेत. हा भाव इतिहासात प्रथमच मिळतोय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या