प्रियांका माळी, प्रतिनिधी पुणे, 7 जून : संपूर्ण देशाचा अभिमान असलेले राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) पुण्यात आहे. एनडीएमधील पुण्यातला टक्का मात्र कमी आहे. त्यामुळे पुण्यात एनडीए आहे, पण एनडीएमध्ये पुणे नाही, असं म्हंटलं जातं, मात्र, पुण्यातल्या धायरीची लेक असलेल्या जुई ढगेनं हा समज मोडलाय. जुईनं एनडीए प्रवेश परिक्षेत लाखो मुलींना मागं टाकत तिसरा क्रमांक पटकावलाय. त्याचबरोबर मुला-मुलींच्या एकत्र यादीमध्येही तिचा 31 वा क्रमांक आहे. कसा झाला प्रवास? भारतीय लष्कराला अनेक पराक्रमी अधिकारी देणाऱ्या एनडीएमध्ये प्रवेश मिळावा म्हणून दरवर्षी लाखो विद्यार्थी प्रयत्न करत असतात. एनडीएमध्ये यापूर्वी मुलींना प्रवेश नव्हता. दोन वर्षांपूर्वीच मुलींना एनडीएची दारं उघडी झाली. जुई दहावीला असताना परीक्षेच्या वेळी तिचा एनडीएमध्ये नंबर आला होता. त्याचवेळी एनडीएनं जुईच्या मनात घर केलं होतं.
लहानपणापासून धनुर्विद्या शिकणाऱ्या जुईला शिस्त, व्यायाम या गोष्टी नव्या नव्हत्या. एनडीएची दारं मुलींसाठी उघडी झाल्यानंतर तिनं या परीक्षेचा अभ्यास करण्याचं ठरवलं. पण, तिला सहज प्रवेश मिळाला नाही. ती प्रयत्नात तिला अपयश आले. कसा केला अभ्यास? जुई दुसऱ्या प्रयत्नात एनडीएची लेखी परीक्षा उत्तीर्ण झाली. या परीक्षेसाठी गणित आणि जनरल नॉलेज हे विषय असतात. ‘माझा गणित हा विषय कच्चा होता. त्यावर मी विशेष फोकस केला. रोज 12 तास अभ्यास करून संकल्पना क्लियर करण्यावर मी भर दिला. रिटर्न परीक्षा पास झाल्यानंतर माझा भोपाळमध्ये इंटरव्ह्यू होता. पुण्यातलं हे गाव आहे शहरापेक्षा भारी, खुद्द राष्ट्रपतींनीही केलं कौतुक GROUND REPORT सायकॉलॉजी टेस्ट, स्क्रिनिंग टेस्ट, पर्सन इंटरव्ह्यू या सारख्या प्रत्येक पातळीवर माझी कामगिरी चांगली झाली. एकूण 13 मुलींची शिफारस यावेळी करण्यात आली. त्यानंतर झालेल्या मेडिकल टेस्टमध्येही मी क्लिअर झाले. त्यानंतर मेरिट लिस्ट जाहीर झाली. त्यावेळी पहिल्याच पेचवर माझं नाव पाहिलं,’ असं जुईनं सांगितलं. जुईच्या पुण्यातील विश्वकर्मा इंजिनिअरिंक कॉलेजमध्ये प्राध्यापिका आहेत. तर वडिल कमिन्समध्ये क्वालिटी ऑफिसर म्हणून काम करतात. ढगे कुटुंबियातून सैन्य दलात दाखल होणारी जुई पहिलीच व्यक्ती आहे. माझ्या या यशात मला नेहमी पाठिंबा देणाऱ्या आई-वडिलांचा मोठा वाटा आहे, असं तिनं सांगितलं.