JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / पुणे / Pune: वादळी वाऱ्यामुळे रिक्षावर कोसळलं मोठं झाड, कसे वाचवले प्राण

Pune: वादळी वाऱ्यामुळे रिक्षावर कोसळलं मोठं झाड, कसे वाचवले प्राण

वादळी वाऱ्यामुळे पुण्यातील रास्ता पेठेतील केईएम रुग्णालयासमोरील भलं मोठं झाड रिक्षाचालकाच्या अंगावर कोसळलं होतं. कसे वाचवले प्राण, अंगावर काटा आणणारे फोटो

0106

जोरदार पावसासोबत वाहणाऱ्या वेगवान वाऱ्यामुळे पुण्यात भलंमोठं झाडं कोसळल्याची घटना समोर आली आहे.

जाहिरात
0206

वादळी वाऱ्यामुळे पुण्यातील रास्ता पेठेतील केईएम रुग्णालयासमोरील भलं मोठं झाड रिक्षाचालकाच्या अंगावर कोसळलं आहे. अचानक रिक्षावर हे झाड पडल्यानं रिक्षाचालकही रिक्षात अडकून पडला होता.

जाहिरात
0306

दरम्यान परिसरातील लोकांनी तातडीनं या घटनेची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना दिली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत रिक्षाचालकाचा जीव वाचवला आहे.

जाहिरात
0406

एवढं मोठं झाड रिक्षावर कोसळूनही वयोवृद्ध रिक्षाचालक बचावल्यानं अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. या दुर्दैवी अपघातात रिक्षाचं बरंच नुकसान झालं असून रिक्षाचालकाला मुका मार लागला आहे.

जाहिरात
0506

अग्निशमन दलाच्या जवानांनी संबंधित रिक्षाचालकाला अलगदपणे उचलून बाहेर काढलं आहे.

जाहिरात
0606

अग्निशमन दलानं त्वरित घटनास्थळी धाव घेत आपलं कर्तव्य पार पाडल्यानं अग्निशमन दलाच्या जवानांचं देखील कौतुक केलं जात आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या