कुरुलकर ई मेल मार्फत ISI च्या संपर्कात
वैभव सोनवणे, प्रतिनिधी पुणे, 9 मे : पुणे : पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून एटीएसने अटक केलेल्या डीआरडीओचे संचालक आणि शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर याच्या कोठडीची मुदत मंगळवारी संपणार आहे. कुरुलकर याला आज एटीएसच्या पथकाकडून न्यायालयात हजर करणार आले होते. एटीएसच्या तपास अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रदीप कुरुलकर हे ई मेल मार्फत पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांच्या संपर्कात होते, असं एटीएसच्या तपासात निष्पन्न झाल आहे. फॉरेन्सिक तपासणीतून काय समोर आलं? एटीएसने प्रदीप कुरुलकर यांचे जप्त केलेले मोबाईल, लॅपटॉप आणि इतर तांत्रिक साहित्य फॉरेन्सिक लॅबोरेटरीकडे तपासणीसाठी पाठवले होते. त्यातुन ही बाब समोर आली आहे. प्रदीप कुरुलकर हे डीआरडीओच्या गेस्ट हाऊसमधे अनेक महिलांना भेटत होते. त्याचाही तपास करण्याची गरज असल्याच एटीएसने न्यायालयात सांगितलं. प्रदीप कुरुलकर यांच्या बॅक अकाउंटमधे बाहेरच्या देशातून पैसै आले का? याचाही तपास करण्यात येणार आहे. प्रदीप कुरुलकर यांनी सरकारी पासपोर्टचा उपयोग करुन पाच ते सहा देशांना भेटी दिल्याचं एटीएसला आढळलं आहे. वाचा - भांडणानंतर गर्लफ्रेंडला मनवण्याचा प्रयत्न ठरला अपयशी; अन्.., भीतीदायक शेवट मोबाईलमधील डेटा डिलीट प्रदीप कुरुलकर यांच्याकडील मोबाईल फोन, लॅपटॉप आणि पेन ड्राईव्ह मधील डेटा त्यांनी डिलीट केला आहे. तो डेटा नक्की काय होता आणि तो त्यांनी पाकिस्तानी गुप्तचर विभागाला दिला आहे का? याचा तपास करण्याची गरज असल्याचं एटीएसने न्यायालयात सांगितले. तपास कामासाठी 15 मेपर्यंत ते एटीएसच्या ताब्यात राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची माहिती संरक्षण संशोधन संस्थेचे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर हे पुणे येथील त्यांच्या कार्यालयामधून पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह (PIO) चे हस्तक यांच्याशी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉटअपद्वारे व्हाईस मेसेज, व्हिडिओ कॉलने संपर्कात राहिले असल्याची माहिती एटीएसलाला मिळाली होती. त्यासोबत डीआरडीओच्या शास्त्रज्ञ पदाचा गैरवापर करत त्यांच्या ताब्यात असलेली संवेदनशील शासकीय माहिती ते पाकिस्तानला पुरवत असायचे. प्राथमिक अंदाजानुसार हनी ट्रॅपमध्ये सापडल्याने ते पाकिस्तानला माहिती देत असल्याचा संशय आहे.