JOIN US
मराठी बातम्या / पुणे / टोमॅटोत अवतरले गणपती बाप्पा! नारायणगाव बाजार समितीतील त्या टोमॅटोनं वेधलं लक्ष

टोमॅटोत अवतरले गणपती बाप्पा! नारायणगाव बाजार समितीतील त्या टोमॅटोनं वेधलं लक्ष

मंगळवारी विक्रीसाठी आलेल्या टोमॅटोमध्ये गणपती बाप्पानं दर्शन दिलं आहे. गणपती बाप्पाच्या आकाराचा एक लक्षवेधी टोमॅटो येथील एका मजुराच्या हाती लागला.

जाहिरात

टोमॅटोत अवतरले गणपती बाप्पा!

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रायचंद शिंदे, जुन्नर 13 जुलै : राज्यात आणि देशात टोमॅटोला सोन्याचे भाव आले आहेत. टोमॅटोचे दर चांगलेच वधारले आहेत. बाजारात टोमॅटोच्या किमतींनी अगदी 200 रूपये प्रतिकिलोचा आकडाही गाठला आहे. यानंतर सोशल मीडियावरही टोमॅटोच्या दरांबाबत जोक्स आणि मीम्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. यामुळे टोमॅटो सध्या प्रचंड चर्चेत आला आहे. उत्तर भारताला सर्वाधिक टोमॅटो पुरवठा करणारी बाजारपेठ अशी ओळख जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील बाजार समितीला आहे. या समितीच्या आवारात एक आगळंवेगळं टोमॅटो पाहायला मिळालं. मंगळवारी विक्रीसाठी आलेल्या टोमॅटोमध्ये गणपती बाप्पानं दर्शन दिलं आहे. गणपती बाप्पाच्या आकाराचा एक लक्षवेधी टोमॅटो येथील एका मजुराच्या हाती लागला. Tomato farming : टोमॅटो झाला डॉलरपेक्षा भारी अन् करोडपती झाला पुणेकर शेतकरी! या टोमॅटोचा फोटो समोर येताच तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. उत्तर भारतातून नारायणगाव परिसरात अनेक व्यपारी आणि 1000 पेक्षा जास्त मजूर टोमॅटो क्रेट भरण्यासाठी दाखल झाले आहेत. यातच उत्तर प्रदेशच्या बवई (ता. ग्यानपूर, जिल्हा भांनडोही) येथील मजूर शिवराज बिंद हा सुद्धा दाखल झाला आहे. मंगळवारी टॉमेटो निवड आणि पॅकिंग करत असताना त्याला बाप्पाच्या आकाराचं हे अनोखं टोमॅटो दृष्टीस पडलं. बाप्पाच्या आकाराचं टोमॅटो पाहून शिवराजलाही विशेष वाटलं. यानंतर शिवराजने या टोमॅटोसोबत फोटो काढून तो सोशल मीडियावर शेअर केला आणि बघता बघता हा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. एकीकडे टोमॅटोनं ग्राहकांची चिंता वाढवली असतानाच दुसरीकडे या टोमॅटोनं मात्र सगळ्यांचंच मन जिंकलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या