दर्शना पवार
पुणे, 21 जून : एमपीएससी परीक्षेत तृतीय क्रमांकानं उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवार हिच्या हत्येने एकच खळबळ उडाली आहे. रविवारी (18 जून) राजगडच्या पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळला होता. दर्शना पवार हिचा खून झाल्याची माहिती शवविच्छेदन अहवालातून उघड झाली आहे. दर्शनाचा मित्र फरार झाला असून, त्यानेच खून केल्याचा संशय पोलिसांनी वर्तविला आहे. दरम्यान, घटनेपूर्वीचा दर्शनाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात दर्शना खूप आनंदी आणि आत्मविश्वासाने भरलेली दिसत आहे. सत्कार स्वीकारायला गेली ती परतलीच नाही दर्शना दत्ता पवार (वय 26, रा. कोपरगाव, जि. अहदनगर) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. दर्शना राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली होती. वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून तिची निवडही झाली होती. पुण्यातील एका संस्थेकडून तिचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. 9 जून रोजी ती पुण्यात आली होती. पुण्यातील एका अकॅडमीमध्ये विशेष प्राविण्य मिळवून उतीर्ण झाल्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमात आपलं मनोगत व्यक्त करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
12 जून रोजी सिंहगडावर जायचे आहे, असं मैत्रिणीला सांगून ती घराबाहेर पडली. दर्शनाने कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली होती. तिच्यासोबत राहुल दत्तात्रय हंडोरे हा मित्र होता. 12 जूनला तिच्या कुटुंबीयांनी संपर्क साधल्यावर मोबाइल बंद असल्याचे लक्षात आले. त्यानंतर कुटुंबीयांनी शोध सुरू केला. मात्र, तिचा ठावठिकाणा न लागल्याने कुटुंबीयांनी दर्शना बेपत्ता असल्याची तक्रार सिंहगड रस्ता पोलिसांत दिली.
2 मुलांना विहिरीत फेकलं, पत्नीचा दाबला गळा; डॉक्टरने स्वतःसह संपवलं कुटुंब सीसीटीव्ही फुटेजमधून महत्त्वाची माहिती हाती दर्शनाचा मित्र राहुल हंडोरे बेपत्ता झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनीही तो बेपत्ता झाल्याची तक्रार वारजे पोलिस ठाण्यात दिली. राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी सतीचा माळ परिसरात रविवारी दर्शनाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला. दर्शना आणि तिचा मित्र राहुल 12 जून रोजी दुचाकीवरून वेल्हे तालुक्यातील राजगड किल्ला परिसरात गेले. सकाळी सव्वासहाच्या सुमारास दोघे जण गडाच्या पायथ्याशी पोहोचले. दोघांनी गड चढायला सुरुवात केली. सकाळी दहाच्या सुमारस राहुल गडावरून एकटाच खाली आला. राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हॉटेलच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरणातून ही माहिती उपलब्ध झाली आहे. राहुल फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.