JOIN US
मराठी बातम्या / पुणे / Marathi Bhasha din : संदीप खरेंनी सादर केली Exclusive कविता, पाहा Video

Marathi Bhasha din : संदीप खरेंनी सादर केली Exclusive कविता, पाहा Video

Marathi Bhasha din 2023 : तरुणाईचे लाडके कवी संदीप खरे यांनी आजच्या खास दिवसानिमित्त एक कविता सादर केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नीलम कराळे, प्रतिनिधी पुणे, 27 फेब्रुवारी :  ‘माझा मराठीची बोलू कौतुके! परी अमृतातेहि पैजासी जिंके! असं मराठी भाषेचं वर्णन संत ज्ञानेश्वरांनी केलं आहे. अमृताशीही पैजा जिंकणाऱ्या आपल्या माय मराठी भाषेची गणना ही जगातील एका महान भाषेमध्ये होते. या भाषेचे थोरवी पुढील पिढीला कळावी म्हणून दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन साजरा केला जातो. मराठी भाषा दिन 27 फेब्रुवारी रोजीच साजरा का केला जातो याचं कारणही खास आहे. या दिवशी मराठीतील ज्येष्ठ लेखक, कवी, नाटककार वि.वा. शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांची जयंती आहे. कुसुमाग्रजांनी अनेक कथा, कादंबरी, काव्यसंग्रह आणि नाटक याच्या माध्यमातून मराठी भाषेला गौरव प्राप्त करुन दिला आहे. त्यांच्या कार्याचे स्मरण आणि मराठी भाषेचा गौरव करण्यासाठी 27 फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो. Marathi Bhasha Din : भाषा दिनानिमित्त WhatsApp Statusला ठेवा सुंदर शुभेच्छा संदेश तरुण पिढीचे आवडते कवी संदीप खरे यांनी मराठी राजभाषा गौरव दिनाच्या निमित्तानं त्यांची एक अप्रकाशित कविता सादर केली आहे. नव्या पिढीला समजेल आणि भावेल या पद्धतीनं प्रवाही भाषेत कविता लिहणारे आणि सादर करणारे कवी म्हणून संदिप खरे प्रसिद्ध आहेत. संदीप खरे आणि डॉ. सलिल कुलकर्णी यांच्या ‘आयुष्यावर बोलू काही’ या कवितांच्या कार्यक्रमाचे अनेक शो जगभर झाले आहेत. संदीप खरे यांनी आजच्या खास दिवसानिमित्त एक खास कविता सादर केली आहे. ‘सही रे सही’, 5 लाख मराठी भाषिकांना स्वाक्षरी शिकवणारे शिक्षक, Video संदीप खरेंची अप्रकाशित कविता इवले माझे इवले इवले अगदी जग हे इवले गं जे जे बघतो ते माझ्याहून मोठे मोठे दिसले गं! फांदी नाही, काडी पडली तरी गमते आकाश ढळे साधी ठिणगी माझ्यासाठी वनवा होऊन स्वैर जळे! थेंब एकुटा पूर जसा की माझे जग वाहून न्या एक कवडसा मला सूर्यसा तलखी होऊन तडपाया! एकच दाना भासे मजला पाठीवरची गोणी गं एका वेळी एकच साखर कण मी वाहून आणी गं! किती डवरल्या गप्पा आल्या कानी ज्यांना मुळ नसे पण मी इवला अंग चोरुनी अजुन इवला होतं असे! मनोरथांची इवल्या नाही भविष्यावरी सत्ता गं इवले माझे डोळे बघती इवले आज नी आत्ता गं! इवल्या कानी इवले गाणी आणि कवितांची वस्ती गं कुणी पुटपुटते मत्सर त्यांच्या कानठळ्या मज बसती गं! अगदी इवले माझे प्रियतम ,अगदी इवली माझी प्रीती हे मोठेपण म्हणून सुखाचे जे रमते इवल्याच कुशीत!!

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या