JOIN US
मराठी बातम्या / पुणे / कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपला पाठिंबा, पण... मनसेचं ठरलं!

कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपला पाठिंबा, पण... मनसेचं ठरलं!

चिंचवड आणि कसबा पेठ या पुण्याच्या पोटनिवडणुकीसाठी मनसेने त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. कसबा आणि चिंचवड या दोन्ही ठिकाणी मनसेने भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 14 फेब्रुवारी : चिंचवड आणि कसबा पेठ या पुण्याच्या पोटनिवडणुकीसाठी मनसेने त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. कसबा आणि चिंचवड या दोन्ही ठिकाणी मनसेने भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. आम्ही भाजपला पाठिंबा देणार पण प्रचारात सहभागी होणार नाही, असं मनसे नेते बाबू वागसकर यांनी सांगितलं आहे. भाजप नेत्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांना पाठिंबा देत असल्याचं वागसकर यांनी जाहीर केलं आहे. चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीत भाजपला पाठिंबा द्यावा अशी विनंती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी राज ठाकरे यांच्याकडे केली होती. यानंतर मनसेने भाजपला पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला आहे. भाजप आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर कसबा पेठ आणि चिंचवडमध्ये पोटनिवडणूक होत आहे. या दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकासआघाडीच्या नेत्यांना विनंती केली होती, पण कसबा पेठमध्ये काँग्रेसचा तर चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार रिंगणात आहे. कसबा पेठेत भाजपकडून हेमंत रासने यांना तर चिंचवडमधून अश्विनी लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी देण्यात आली. तर काँग्रेसने कसब्यातून रवींद्र धंगेकर यांना आणि राष्ट्रवादीने चिंचवडमधून नाना काटे यांना उमेदवारी जाहीर केली. याआधी अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीवेळीही राज ठाकरे यांनी ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं होतं. यानंतर भाजपने अंधेरीच्या निवडणुकीतून उमेदवार मागे घेतला होता. शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरीची पोटनिवडणूक झाली होती, या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली होती. ऋतुजा लटके यांचा या पोटनिवडणुकीत विजय झाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या