JOIN US
मराठी बातम्या / पुणे / छत्रपतींच्या आशीर्वादामुळेच आम्हाला धनुष्यबाण मिळालं - मुख्यमंत्री शिंदे

छत्रपतींच्या आशीर्वादामुळेच आम्हाला धनुष्यबाण मिळालं - मुख्यमंत्री शिंदे

आज पुण्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते शिवसृष्टीचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी बोलताना छत्रपतींच्या आशीर्वादामुळेच आम्हाला धनुष्यबाण मिळाला असल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

जाहिरात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 19 फेब्रुवारी :  आज पुण्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते शिवसृष्टीचं लोकार्पण करण्यात आलं.  यावेळी बोलताना छत्रपतींच्या आशीर्वादामुळेच आम्हाला धनुष्यबाण मिळाला असल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. अमितभाई यांच्या हस्ते या शिवसृष्टीचं लोकार्पण होतंय याचा मला विशेष आनंद आहे, कारण ते फक्त शिवभक्तच नाहीत तर शिवचरिञाचे अभ्यासक देखील असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून ही शिवसृष्टी साकारण्यात आली आहे. काय म्हणाले मुख्यमंत्री?  यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, शिवजयंती एखाद्या सणासारखी साजरी व्हायला हवी. यासाठी राज्य सरकार पुरेपूर प्रयत्न करत आहे. या शिवसृष्टीच्या उभारणीतून बाबासाहेब पुरंदरे यांनी एक स्वप्न पाहिलं होतं, त्याचा पहिला टप्पा आज सर्वांसाठी खुला होतोय.अमितभाई यांच्याहस्ते या शिवसृष्टीचं लोकार्पण होतंय याचा मला विशेष आनंद आहे, कारण ते फक्त शिवभक्तच नाहीत तर शिवचरिञाचे अभ्यासक देखील असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. हेही वाचा : धनुष्यबाणाच्या निर्णयावर शरद पवार संतापले; दोन शब्दात विषय संपवला राज्य सरकारकडून 50 कोटींची मदत   पुढे बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, राज्य सरकारने देखील या प्रकल्पाला 50 कोटींचा निधी मंजूर केला आहे. आम्ही अजूनही मदत करणार आहोत. अमित शाह यांच्या हस्ते या शिवसृष्टीचं लोकार्पण झालं आहे, त्यामुळे शिवसृष्टीची उभारणी आणखी वेगाने होईल. अमित शाह यांनी लंडनमधील महाराजांचे शिवकालीन साहित्य पुन्हा देशात आणण्यासाठी देखील पुढाकार घेतला असल्याचं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या