JOIN US
मराठी बातम्या / पुणे / पिंपरी-चिंचवडमध्ये प्राचार्यांच्या केबिनमध्ये विद्यार्थ्यानं डोकं आपटून घेतलं; धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज आलं समोर

पिंपरी-चिंचवडमध्ये प्राचार्यांच्या केबिनमध्ये विद्यार्थ्यानं डोकं आपटून घेतलं; धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज आलं समोर

महात्मा फुले विद्यालयात शिकणार्‍या एका विद्यार्थ्याने प्राचार्याच्या केबिनमध्ये दरवाजावर डोकं आपटून स्वतःचं डोकं फोडून घेतलंय. या धक्कादायक घटनेचं सीसीटीव्ही (cctv) फुटेजही आता समोर आले आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 29 सप्टेंबर : पिंपरी-चिंचवड (Pimpari chinchwad latest news) शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले विद्यालयात एक धक्कादायक घटना घडली आहे. महात्मा फुले विद्यालयात शिकणार्‍या एका विद्यार्थ्याने प्राचार्याच्या केबिनमध्ये दरवाजावर डोकं आपटून स्वतःचं डोकं फोडून घेतलंय. या धक्कादायक घटनेचं सीसीटीव्ही (cctv) फुटेजही आता समोर आले आहे.

संबंधित बातम्या

विद्यार्थी आणि प्राचार्य यांच्यात शैक्षणिक शुल्क भरण्यावरून झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. शुभम बारोट असं डोकं फोडून घेणाऱ्या संबंधित विद्यार्थ्यांचं नाव असून आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून हे चित्रीकरण सध्या वेगानं व्हायरल होत आहे. हे वाचा -  भयंकर! बॉयफ्रेडने सोडल्याने रागाच्या भरात गर्लफ्रेंडने दगड आणि रॉडने असं तुडवलं की तिथेच गेला प्राण कोरोना काळात या विद्यार्थ्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. त्यामुळे आपण 50 टक्केच शैक्षणिक शुल्क भरणार, अशी हमी विद्यार्थी शुभम यानं दिली होती. त्याला प्राचार्य पांडुरंग गायकवाड यांनी देखील मान्यता दिली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा प्राचार्यांनी दिलेला शब्द फिरवला आणि आपल्याला पूर्ण फी भरण्यासाठी तगादा लावला त्यामुळे रागाच्या भरात आपण हे कृत्य केल्याचे शुभमचे म्हणणे आहे. हे वाचा -  Breaking: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; मुंबईत ‘या’ वर्गांसाठी 4 ऑक्टोबरपासून सुरु होणार शाळा; आयुक्तांची माहिती मात्र, असा काही प्रकार घडला नसून शुभमने आपल्याशीच अरेरावी केल्याची शाळा प्रशासनचे म्हणणे आहे. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणी प्राचार्य पांडुरंग गायकवाड यांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला आहे. तर महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप शुभमने करून देखील या प्रकरणी अद्याप पोलिसांनी कोणाविरुद्धही गुन्हा दाखल केलेला नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या