JOIN US
मराठी बातम्या / पुणे / HDFC बँकेने लॉन्च केले दोन नवे FD प्लान, गुंतवणुकीवर मिळेल जोरदार व्याज

HDFC बँकेने लॉन्च केले दोन नवे FD प्लान, गुंतवणुकीवर मिळेल जोरदार व्याज

HDFC बँकेने दोन नवीन FD स्किम सुरू केल्या आहेत. या स्किम मर्यादित कालावधीसाठी गुंतवणुकीसाठी खुल्या असतील. याशिवाय बँकेने इतर फिक्स्ड डिपॉझिट दरही बदलले आहेत.

जाहिरात

एचडीएफसी एफडी रेट्स

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 2 जून :  देशातील सर्वात मोठ्या प्रायव्हेट बँकांपैकी एक असलेल्या HDFC बँकेने मर्यादित कालावधीसाठी दोन स्पेशल फिक्स्ड डिपॉझिट प्लान लॉन्च केले आहेत. बँकेच्या वेबसाइटनुसार, नवीन फिक्स्ड डिपॉझिट स्किम 29 मे 2023 पासून सुरू झाली आहे. बँकेने 35 महिने आणि 55 महिन्यांच्या दोन एफडी योजना सुरू केल्या आहेत. यामध्ये गुंतवणुकीच्या रकमेवर अनुक्रमे 7.20 टक्के आणि 7.25 टक्के दराने व्याज दिले जाईल. दुसरीकडे, ज्येष्ठ नागरिकांनी या FD योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास 0.50 टक्के अतिरिक्त व्याज मिळेल. यासोबतच, या FD योजना मर्यादित कालावधीसाठी गुंतवणुकीसाठी खुल्या आहेत.

दोन नव्या FD स्किम

बँकेच्या म्हणण्यानुसार, 35 महिने किंवा 2 वर्षे 11 महिन्यांच्या कालावधीसह स्पेशल फिक्स्ड डिपॉझिट स्किमवर गुंतवणूक करणाऱ्यांना 7.20 टक्के दराने व्याज मिळेल. त्याच वेळी, बँक 55 महिने किंवा 4 वर्षे आणि 7 महिन्यांच्या कालावधीसह विशेष एफडीवर 7.25 टक्के दराने व्याज देत आहे. याशिवाय एचडीएफसी बँकेने एक वर्ष 15 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीचे व्याजदर बदलून ते 6.6 टक्के केले आहेत. त्याच वेळी, ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर 7.1 टक्के करण्यात आलाय.

इतर कालावधीच्या एफडीच्या व्याजदरांमध्येही बदल

त्याचप्रमाणे 21 महिने ते 2 वर्षांसाठी व्याजदर सात टक्के करण्यात आलाय. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दर 7.5 टक्के करण्यात आला आहे. सामान्यतः एचडीएफसी बँक नियमित नागरिकांसाठी 2 कोटी रुपयांच्या फिक्स्ड डिपॉझिटवर 3% ते 7.10% दर देते. 15 महिने ते 18 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी कमाल व्याजदर दिला जातो.

Special FD: एचडीएफसी, एसबीआय की आयसीआयसीआय बँक? ज्येष्ठ नागरिकांना FD वर कुठे मिळतंय जास्त व्याज?

संबंधित बातम्या

बँक व्याजाची गणना कशी करते?

एचडीएफसी बँक वर्षातील वास्तविक दिवसांच्या आधारे व्याजाची गणना करते. डिपॉझिट एक लीप आणि नॉन-लीप वर्षात असल्यास, व्याज दिवसांच्या संख्येवर आधारित मोजले जाते. म्हणजेच लीप वर्षात 366 दिवस आणि नॉन लीप वर्षात 365 दिवस असतात. गेल्या आर्थिक वर्षात रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये सतत वाढ केली होती. यानंतर बँकांनीही त्यांच्या एफडी योजना आकर्षक करण्यासाठी व्याजदरात वाढ केली. यासोबतच बँकांनी नवीन फिक्स्ड डिपॉझिट स्किम्सही लॉन्च केल्या होत्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या