पुणे, 26 जून : भारताचे सर्वाधिक हिरवाईने नटलेले राज्य म्हणून केरळचा उल्लेख होतो. केरळची संस्कृती संमिश्र आणि विश्वव्यापी आहे आणि ती भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. केरळ जितकं सुंदर आहे तितकीच तिथली खाद्यसंस्कृती देखील आयुष्यात एकदा तरी अनुभवण्याचा विषय आहे. केरळमधील अनेक वस्तू आणि पदार्थ संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत. केरळ मधील वेगवेगळ्या वस्तू आणि पदार्थ आता तुम्हाला पुण्यातही मिळतील. कुठे मिळतील? केरळमधील मसाले, लोणची, सीफूड, केळीचे वेफर्स यांसारखे पदार्थ आपण केरळ वरून आपल्या घरी परत येताना घेऊन येतो. पण आता हे सर्व पदार्थ आपल्याला पुण्यातील कैरली या दुकानात मिळतील. केरळमधील सर्वात प्रसिद्ध लोणची ही आंब्यापासून बनविली जातात. यामध्ये लसूणाचे लोणचे, करवंदाचे लोणचे, भाज्यांचे लोणचे, मिरचीचे लोणचे, कोलंबी/झिंगा माशाचे लोणचे, सीर माशाचे लोणचे यांचा समावेश असतो.
त्यांनतर केरळच्या केळी वेफर्सची तर मजाच न्यारी, कृत्रिम रंग न वापरता हे वेफर्स बनवले जातात. यात कच्ची केळी, बटाटे, फणस, अळकुड्या पासून वेफर्स तयार केले जातात. केरळमधील सी फूड आतिशय प्रसिद्ध आहे आणि झिंगा, कटलफ़िश, स्क्विड मासा आणि इतर काही माशांना वैश्विक बाजारपेठेत भरपूर मागणी आहे. भाजलेले काजू, वेलची देखील खुप प्रसिद्ध आहेत. हे सगळे पदार्थ कैरली या दुकानांमध्ये उपलब्ध आहेत. कोणत्या मिळतात वस्तू? केरळच्या संस्कृतीची प्रतिकेकथकली शो-पीसेस किंवा मुखवटे, केरळमध्ये राजस्थानच्या खालोखाल पुराणावर आधारित भित्तिचित्रांचा साठा आहे. त्याचप्रमाणे केरळमध्ये चंदनाच्या लघु-मूर्ती खूप प्रसिद्ध आहेत. त्यात गणपतीच्या प्रतिमा, त्रिदेव- ब्रह्मा, विष्णू, शिवा, छोट्या स्नेक बोटी, हत्ती याचा समावेश असतो. तलम, शीतल, लाल आणि काळ्या रंगात विणलेल्या, पारंपरिक पुल्पाया अथवा केरळच्या गवती चटया या राज्याच्या हाताने विणायच्या अतिशय जुन्या वस्तूंच्या उत्पादनांपैकी एक वस्तू आहे. हत्तीची प्रतिकृती, नारळाच्या काथ्यापासून बनविलेली उत्पादने या सगळ्या वस्तू आमच्या दुकानामध्ये उपलब्ध असल्याचे दुकानाचे मालक रॉबिन जीजी यांनी सांगितलं .
Pune News : हैदराबादी बिर्याणी विसरा आता ट्राय करा हैदराबादी डोसा, कुठं? पाहा Video
कैरली या एका दुकानाच्या एका छताखाली केरळी खाद्यपदार्थांसह तुम्हाला केरळच्या साड्या देखील मिळतील. सुंदर आणि नक्षीदार काम केलेल्या केरळच्या या साड्या या ठिकाणी उपलब्ध आहे. केरळ आणि तिथल्या वस्तूंविषयी महाराष्ट्रातील अनेक लोकांना आकर्षण असते आणि त्यासाठी या दुकानाची निर्मिती केली असल्याचं रॉबिन जीजी यांनी सांगितलं.