JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / पुणे / पुण्यात आकाराला येणार भन्नाट इको-फ्रेंडली शाळा; खालपासून वरच्या मजल्यापर्यंत सर्वत्र असणार झाडंच झाडं

पुण्यात आकाराला येणार भन्नाट इको-फ्रेंडली शाळा; खालपासून वरच्या मजल्यापर्यंत सर्वत्र असणार झाडंच झाडं

पुण्यात वृक्षांनी वेढलेल्या या शाळेला फॉरेस्ट स्कूल असे नाव देणार. या शाळेची इमारतच अशी वैशिष्ट्यपूर्ण असेल की प्रत्येक मजल्यावर झाडं आणि सर्वांत वर टेरेसवर सायकल ट्रॅक असेल.

0106

गेल्या दशकापासून पुण्यातील प्रदूषण झपाट्याने वाढत आहे. या समस्येवर काही प्रमाणात मात करण्यासाठी एका आर्किटेक्चर फर्मने पुढाकार घेतला आहे. न्यूड्स नावाची ही फर्म एक अद्वितीय शाळा तयार करणार आहे, जिथे सर्वत्र वृक्ष आणि झाडे असतील आणि ही शाळा पूर्णपणे इको-फ्रेंडली असेल. या शाळेला फॉरेस्ट स्कूल असे नाव देणार आहे. (Photo- Nudes website)

जाहिरात
0206

या शाळेच्या इमारतीची रचना Infinity च्या आकाराची आहे. कमीत कमी प्रदूषण करणारं तंत्रज्ञान यासाठी वापरता येईल

जाहिरात
0306

या शाळेची डिझाईन इतर शाळांपासून अगदी वेगळी आहे. या शाळेत सर्वत्र झाडे लावली जातील. शाळेच्या छतावर एक सायकल ट्रॅकही असेल. सायकल छतावर चालवत नेण्यासाठी एक वेगळा मार्गसुद्धा तयार केला जाईल. (Photo- Nudes website)

जाहिरात
0406

शाळेचा प्रत्येक मजला गोलाकार असेल. या मजल्यांना ग्रीन असे नाव देण्यात येणार आहे. हे सर्व मजले एकमेकांपेक्षा वेगळे असतील आणि प्रत्येक मजला विद्यार्थ्यांना काही नवीन गोष्टी शिकवेल. शाळेच्या इमारतीत एक सर्व्हिस ट्रॅकही असेल जेणेकरुन सर्व झाडांची व्यवस्थित काळजी घेता येईल. (Photo- Nudes website)

जाहिरात
0506

या शाळेच्या तळघरात (basement) टेनिस कोर्टही असेल. याशिवाय खास गोष्ट अशी आहे की काही झाडे आणि वनस्पतींची काळजी तज्ज्ञांच्या देखरेखीखाली विध्यार्थ्यांनाही घ्यावी लागेल. (Photo- Nudes website)

जाहिरात
0606

एकंदरीत, ही शाळा नावाप्रमाणे एखाद्या जंगलासारखी असेल. विद्यार्थ्यांना पर्यावरणाचं महत्त्व कळावं आणि हवामान बदल आणि ग्लोबल वार्मिंग यासारख्या विषयांबद्दल देखील शिकता यावं यासाठी या शाळेची रचना आणि निर्मिती करण्यात येणार आहे. (Photo- Nudes website)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या