JOIN US
मराठी बातम्या / पुणे / tomato prices : खूश खबर! टोमॅटो झाले स्वस्त; पुण्यात प्रति किलो टोमॅटोला मिळतोय एवढा भाव!

tomato prices : खूश खबर! टोमॅटो झाले स्वस्त; पुण्यात प्रति किलो टोमॅटोला मिळतोय एवढा भाव!

टोमॅटोचे दर चांगलेच कडाडले आहेत. टोमॅटोचा दर प्रति किलो दीडशे रुपयांच्या पार पोहोचला आहे, मात्र पुण्यातून दिलासादायक बातमी समोर आली आहे.

जाहिरात

टोमॅटोच्या दरात घसरण

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 18 जुलै, चंद्रकांत फुंदे :  टोमॅटोचे दर चांगलेच कडाडले आहेत. टोमॅटोचा दर प्रति किलो दीडशे रुपयांच्या पार पोहोचल्यानं सर्वसामान्य लोकांच्या आहारातून टोमॅटो गायब झाला आहे. टोमॅटोचे दर गगनाला भिडले असताना दुसरीकडे मात्र पुण्यातून दिलासादायक बातमी समोर येत आहे. घाऊक मार्केटमध्ये टोमॅटोचे दर प्रति किलोमागे वीस रुपयांनी कमी झाले आहेत. पुणे मार्केट यार्डमध्ये काल-परवापर्यंत टोमॅटोला प्रति किलोमागे 100 रुपयांपेक्षा अधिक दर मिळत होता. मात्र आज टोमॅटोचे दर हे प्रति किलो 80 ते 90 रुपयांवर आले आहेत. किरकोळ बाजारात दर कायम  मात्र जरी घाऊक बाजारात टोमॅटोचे दर कमी झाले असले तरी देखील अद्याप किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर जैसेथे आहेत. पुण्यातील किरोकळ मार्केटमध्ये टोमॅटोला प्रति किलो 120 ते 140 रुपये एवढा दर मिळत आहे. टोमॅटोची आवक वाढत असून, येत्या काही दिवसांत टोमॅटोचे भाव कमी होण्याची शक्यता आहे. काकडीचे दर घसरले  दरम्यान एकीकडे टोमॅटोचे भाव वाढत आहेत, मात्र दुसरीकडे काकडीचा भाव कमी झाला आहे. कवडीमोल किंमतीनं काकडी विकण्याची पाळी शेतकऱ्यांवर आली आहे. टोमॅटोसोबतच इतर काही भाजांना देखील सध्या बाजारात चांगला भाव मिळत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या