JOIN US
मराठी बातम्या / पुणे / तब्बल एक वर्षानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरू; 27 अर्जातून निवड

तब्बल एक वर्षानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरू; 27 अर्जातून निवड

तब्बल एक वर्षानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरू मिळाले आहेत. डॉ. सुरेश गोसावी यांची नवीन कुलगुरू म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

जाहिरात

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी पुणे, 6 जून : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदी डॉ. सुरेश गोसावी यांची नियुक्ती झाली आहे. राज्यपाल कार्यालयाने याची अधिकृत घोषणा केली आहे. त्यामुळे तब्बल एक वर्षानंतर गोसावी यांच्या रूपाने पुणे विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरू मिळाले आहेत. पुणे विद्यापीठाला मिळाले नवीन कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी अर्ज केलेल्या 27 उमेदवारांमधून कुलगुरू शोध समितीने पुणे विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. सुरेश गोसावी, पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर, पुणे विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागाचे प्रा.अविनाश कुंभार, भौतिकशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. संजय ढोले आणि कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाचे डॉ. विजय फुलारी या पाच उमेदवारांची नावे शॉर्ट लिस्ट केली होती. त्यातून डॉ. सुरेश गोसावी यांची निवड करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठालाही मिळाले कुलगुरू राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी डॉ रवींद्र दत्तात्रय कुलकर्णी यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी  नियुक्ती  केली आहे; तर डॉ सुरेश वामनगीर गोसावी यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपालांनी डॉ संजय घनश्याम भावे यांची डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती केली आहे. वाचा - Pimpri Chinchwad : नामांतराचं लोण आता पुण्यात! जिजाऊनगर करा म्हणून शहरभर लागले होर्डींग्ज; कोणी केली मागणी डॉ रवींद्र कुलकर्णी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी येथे वरिष्ठ प्राध्यापक आहेत तर डॉ सुरेश गोसावी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात वरिष्ठ प्राध्यापक आहेत. डॉ संजय भावे डॉ  बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथे ऍग्रि. बॉटनी विभाग विभागप्रमुख आहेत. भावे यांच्या रूपाने दापोली कोकण कृषी विद्यापीठाला स्थानिक भूमिपुत्र कुलगुरू मिळाला आहे, डॉक्टर संजय भावे यांचे शिक्षण दापोली कोकण कृषी विद्यापीठातच झाले असून भावे मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत, त्यांचा शैक्षणिक प्रवास व नोकरी  दापोली कोकण कृषी विद्यापीठ आहे. त्यांच्या रूपाने दापोली कोकण कृषी विद्यापीठाला अभ्यासू व कोकण कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्राच्या भौगोलिक परिस्थितीची  जाण असलेला कुलगुरू लाभल्याने समाधान व्यक्त होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या