JOIN US
मराठी बातम्या / पुणे / Pune Car Accident : पुण्यातून कोकणात फिरायला जाताना कारला अपघात, धरणात बुडाली; तरुणीसह तिघांचा मृत्यू

Pune Car Accident : पुण्यातून कोकणात फिरायला जाताना कारला अपघात, धरणात बुडाली; तरुणीसह तिघांचा मृत्यू

Pune Car Accident : पुण्याहून वरंधघाट मार्गे कोकणात जाणाऱ्या मार्गावर ही घटना घडली. अपघातात मृत्यूमुखी पडलेले तरुण पुण्यातील असल्याचे समजते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 29 जुलै : पुण्यातील नीरा देवघर धरणाच्या पाण्यात कार कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला असून एक जण बचावला आहे. पुण्याहून वरंधघाट मार्गे कोकणात जाणाऱ्या मार्गावर ही घटना घडली. अपघातात मृत्यू झालेले सर्वजण पुण्यातील असल्याचे समजते. याबाबत मिळालेली माहिती अशी की, पुण्यातील रावेत येथून चार जण फिरण्यासाठी निघाले होते. तेव्हा भोर तालुक्यातील निरादेवघर धरण मार्गाने महाडकडे जात असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला. धुके  आणि पाऊस असल्याने रस्त्याचा अंदाज न आल्याने वळणावर गाडी 200 फूट उंचीवरून धरणाच्या पाण्यात पडली. पुणे दहशतवादी अटक प्रकरणाचे धागेदोरे रत्नागिरीपर्यंत, चौथ्या संशयिताला अटक अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून एक जण बचावला आहे. अपघातातून बचावलेल्या तरुणाचे नाव संकेत जोशी वय 26, रा. बाणेर असं आहे. तर  अक्षय रमेश धाडे, स्वप्निल शिंदे आणि तरुणी हरप्रित यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सह्याद्री रेस्क्यू फोर्स भोईराज जल आपत्ती व्यवस्थापन यांच्या मदतीने पोलीसांनी दोन मृतदेह बाहेर काढले आहेत. अजून एका मृत व्यक्तीचा शोध सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या