JOIN US
मराठी बातम्या / पुणे / Pune News : पालखीच्या सुरक्षेसाठी पुणे पोलिसांचे रायडर्स सज्ज, नव्या तंत्रज्ञानानं घेणार वारकऱ्यांची काळजी, Video

Pune News : पालखीच्या सुरक्षेसाठी पुणे पोलिसांचे रायडर्स सज्ज, नव्या तंत्रज्ञानानं घेणार वारकऱ्यांची काळजी, Video

आषाढी वारीच्या निमित्तानं पालखीच्या सुरक्षेसाठी पुणे पोलीस सज्ज झाले आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

प्रियांका माळी, प्रतिनिधी पुणे, 12 जून :  ग्यानबा-तुकारामाच्या जयघोषात आषाढी वारीला आता सुरूवात झाली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या स्वागतासाठी संपूर्ण पुणे शहर सज्ज झालंय. पुणे शहरात वारी मुक्कामी असताना सुरक्षा व्यवस्था चोख असणार आहे. वारकऱ्यांच्या तसंच दोन्ही पालखीच्या सुरक्षेसाठी विशेष काळजी घेण्यात येत आहे. खास रायडर्स सज्ज संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या सुरक्षेसाठी पुणे पोलिसांकडून खास रायडर्स तैनात करण्यात आलेत. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीसाठी ‘संजीवनी रायडर्स’ आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीसाठी ‘वैकुंठ रायडर्स’ सातत्याने पालखीसोबत राहणार आहेत.

हे रायडर्स दुसरे तिसरे कोणी नसून पुणे वाहतूक शाखेचे पोलीस आहेत. एका पालखीसोबत चार गाड्या आणि आठ वाहतूक पोलीस असणार आहेत. वाहतूक पोलिसांसाठी नव्या कोऱ्या आठ गाड्या देण्यात आल्या आहेत. लोकेशन ट्रॅकिंग, सायरन अशा वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर गाड्यांमधे केला आहे. पालखी पुणे शहरात प्रवेश करताना पासून ते शहरा बाहेर पडेपर्यंत पोलीस रायडर्स सातत्याने माऊलींच्या पालखीसोबत असणार आहेत. ‘इथं’ ट्रॅक करा करंट लोकेशन बदलत्या काळानुसार यावर्षी आषाढीच्या वारीत टेक्नॉलॉजीचा वापर होणार आहे. वाहतूक पोलीस या टेक्नॉलॉजीचा वापर करणार आहेत. संत तुकाराम महाराजांची पालखी आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी यांचे करंट लोकेशन नवीन लाँच केलेल्या वेबसाईटवर दिसणार आहे. महिला वारकऱ्यांची इथं खास व्यवस्था, पुण्यात 40 ठिकाणी विशेष कक्षाची स्थापना, Video माय सेफ ऑनलाइन पालखी ट्रॅक नावाने पुणे महानगरपालिकेतर्फे ही नवीन वेबसाईट लॉन्च करण्यात आली आहे. पूर्वी आजूबाजूला गर्दी दिसली की तिथेच पालखी आहे असा अंदाज असत परंतु आता पालखी नेमकी कुठपर्यंत आली, हे मोबाईल मध्येच पाहता येणार आहे, अशी माहिती पुणे वाहतूक पोलीस मनोज बदाडे यांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या