बॉलिवूडची बार्बी गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री कतरिना कैफ सध्याची आघाडीची अभिनेत्री आहे. पण या शिखरावर पोहोचण्यासाठी कतरिनाला खडतर प्रवास करावा लागला होता. कतरिनाच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या तिचा प्रेरणादायी प्रवास.
कतरिनाचा जन्म 16 जुलै 1983 ला हाँगकाँगला झाला होता. कतरिनाने अनेक देशांत वास्तव्य केलं आहे तर तिची आई सुझेन तुरकेतो ही एक वकिल होती.
बालपणीच वडिलांनी साथ सोडलेल्या कतरिनाचा प्रवास फारच खडतर होता. कतरिनाच्या आईने तिला आणि तिच्या भावंडाना एकटीने सांभाळलं होतं. तर अनेक देशांत वास्तव्य केल्यावंतर ते लंडनमध्ये सेटल झाले.
कतरिनाचे वडील मोहम्मद कैफ हे ब्रिटीश -काश्मिरी बिजनेसमॅन होते. कतरिना लहान असतानाच तिच्या आईबाबांचा घटस्फोट झाला होता. तिला आणखी सहा भावंड आहेत. पाच बहिणी तर १ भाऊ असे एकून ७ कैफ भावंड आहेत.
कतरिनाने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, "मी फार लहान असतानाच आईबाबा वेगळे झाले होते, माझ्या आईने आम्हाला एकटीने वाढवलं. तिने आम्हाला खूपच जिद्दीने मोठं केलं." वडिलांविषयी बोलताना ती म्हणाली, "आम्ही त्यांच्याशिवाय मोठे झालो. मला काहितरी हरवल्याचं भासतं. जेव्हा मी माझ्या मित्रमैत्रींना त्यांच्या वडिलांसोबत पाहायचे तेव्हा मला वाटायचं , जर माझ्याकडेही हे असंत. पण यावर तक्रार करण्यापेक्षा मी माझ्याकडे जे काही आहे त्यासाठी फारच कृतज्ञ आहे."
कतरिनाने वयाच्या १४ व्या वर्षीच मॉडेलिंग करायला सुरुवात केली होती. त्यानंतर तिने मॉडेलिंग आणि अभिनय दोन्ही क्षेत्रात करिअर करायचं ठरवलं.
कतरिनाचं आपल्या कुटुंबाशी आपल्या बहिणींशी अगदी घट्ट नातं आहे. अनेकदा ती त्यांच्यासोबत वेळ घालवते. तिची लहाण बहीण इझाबेल कैफ ही देखील मॉडेल आणि अभिनेत्री आहे.
२००२ साली कतरिनाने बूम या चित्रपटातून आपल्या बॉलिवूडमधील करिअरला सुरूवात केली होती. त्यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिलं नाही. कतरिना सध्या बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे.