झी मराठीवर नुकत्याच सुरू झालेल्या बस बाई बस या कार्यक्रमाच्या आजच्या दुसऱ्या भागात अभिनेत्री अमृता खानविलकर हजेरी लावणार आहे.
अभिनेता सुबोध भावे या कार्यक्रमात सुत्रसंचालकाच्या भुमिकेत आहे.
खासदार सुप्रिया सुळेंबरोबरचा पहिला धम्माल एपिसोड रंगल्यानंतर आता सुबोध अमृताबरोबर मनोरंजनाची बस घेऊन सुसाट मनोरंजन करणार आहे.
अभिनेत्री उर्मिला नेहमी प्रमाणेच तिच्या डान्सनं प्रेक्षकांना घायाळ करताना दिसणार आहे. बसमधील महिलांबरोबर अमृता चंद्रमुखी गाण्यावर थिरकताना पाहायला मिळणार आहे.
मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला असून महिलांच्या प्रश्नांची उत्तर देताना अमृताची पुरती दमछाक उडणार आहे.
अमृताच्या अनेक चांगल्या वाईट सवयींचा भांडा फोड आजच्या भागात होणार आहे.
कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये महिला तिला 'तुला भाकरी करता येते का चपाती?', 'घाबरट आहे का बिनधास्त?', असे बेधडक प्रश्न विचारता दिसत आहेत.
महिलांच्या या दमदार प्रश्नांची अमृता काय उत्तर देणार हे पाहण्यासाठी प्रेक्षाकांची उत्सुकता वाढली आहे.
हॉटेलच्या रुममध्ये एकटी असले की मी सगळे लाईट्स चालू करुन ठेवते, असा एक खुलासा अमृतानं केला आहे. त्याचा प्रोमो पाहायला मिळत आहे.
प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अमृताचा आतापर्यंतचा प्रवास कसा होता हे आजच्या भागात प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे.
बस बाई बसच्या आजच्या भागात काय रंगत येणार हे रात्री 9:30 वाजता झी मराठीवर पाहायला मिळणार आहे.