JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / HBD Akshay Kumar: 'सुर्यवंशी' ते 'बच्चन पांडे', अक्षयचे हे मोठे 7 चित्रपट थिएटर्समध्येच होणार प्रदर्शित

HBD Akshay Kumar: 'सुर्यवंशी' ते 'बच्चन पांडे', अक्षयचे हे मोठे 7 चित्रपट थिएटर्समध्येच होणार प्रदर्शित

बॉलिवूडचा ‘खिलाड़ी’ कुमार म्हणजेच अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar Birthday) आज वाढदिवस. आज अक्षय बॉलिवूडचा सर्वाधिक लोकप्रिय आणि यशस्वी अभिनेता ठरला आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या त्याच्या आगामी मोठ्या चित्रपटांविषयी.

0108

बॉलिवूडचा 'खिलाड़ी' कुमार म्हणजेच अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar Birthday) आज वाढदिवस. अक्षयने आता ५४व्या वर्षात पदार्पण केलं आहे. १९९१ साली सौंगद या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरला सुरूवात केली होती. आज अक्षय बॉलिवूडचा सर्वाधिक लोकप्रिय आणि यशस्वी अभिनेता ठरला आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या त्याच्या आगामी मोठ्या चित्रपटांविषयी.

जाहिरात
0208

अक्षय कुमार आणि कॅटरीना कैफ स्टारर 'सूर्यवंशी'चा ट्रेलर मागील वर्षीच प्रदर्शित झाला होता. तर मागील वर्षी एप्रिल महिन्यातच चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र लॉकडाउन आणि निर्बंधांमुळे चित्रपटाचं प्रदर्शन रखडलं आहे.

जाहिरात
0308

अक्षय कुमारचा 'पृथ्वीराज' देखील प्रदर्शनासाठी तयार आहे. मात्र लॉकडाउन आणि निर्बंधामुळे त्याचंही प्रदर्शन रखडलं आहे. यात २०१७ची मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर डेब्यू करत आहे.

जाहिरात
0408

'बच्चन पांडे' चित्रपटाचं देखील शुटींग पूर्ण झालं आहे. मात्र निर्बंधामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निश्चीत झाली नाही. यात जॅकलिन फर्नांडीझ देखील आहे.

जाहिरात
0508

'अतरंगी रे' चित्रपटाचं नुकतंच शुटींग पूर्ण झालं आहे. चित्रपटात अक्षय कुमार, सारा अली खान आणि धनुष देखील आहे. निर्माते चित्रपट थिएटर की ओटीटी वर प्रदर्शित करायचा या संभ्रमात आहेत.

जाहिरात
0608

अक्षय कुमारच्या रामसेतू चित्रपटाचं शुटींग अयोध्येत सुरू होतं मात्र अक्षयला कोरोना झाल्यानंतर शुटींग थांबवण्यात आलं. अद्याप शुटींग पूर्ण झालं नाही. यात नुशरत भरूचा देखील आहे.

जाहिरात
0708

अक्षय कुमार चित्रपट 'रक्षाबंधन'साठीही शुटींग करत आहे. यात अभिनेत्री भूमी पेडणेकर देखील आहे.

जाहिरात
0808

2012 साली आलेला चित्रपट 'ओह माय गॉड'चा सीक्वल 'ओह माय गॉड 2' मध्येही अक्षय दिसणार आहे मात्र अद्याप शुटींग सुरू झालं नाही.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या