JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / फोटो गॅलरी / Prabhas Marriage: अभिनेत्याचा लग्नाला होकार; एनआयआर मुलीसोबत बांधणार लग्नगाठ, PHOTOS

Prabhas Marriage: अभिनेत्याचा लग्नाला होकार; एनआयआर मुलीसोबत बांधणार लग्नगाठ, PHOTOS

दाक्षिणात्य अभिनेता प्रभास (Prabhas) आपल्या अभिनयाच्या जोरावर नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. प्रभासचे अनेक चाहते त्याच्या लग्नाची वाट पाहात असतानाच आता त्याच्या लग्नाबद्दलची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मात्र, ही अनुष्का नसून एक एनआयआर मुलगी आहे.

0106

बाहुबली या सिनेमाच्या यशानंतर प्रभासच्या प्रसिद्धीत कमालीची वाढ झाली. यानंतर प्रभास आणि अनुष्का शर्मा यांच्या रिलेशनशिपविषयीच्या बातम्या समोर येत होत्या. मात्र, आता समोर आलेली ही बातमी प्रभासच्या चाहत्यांसाठी आश्चर्याचा धक्का असणार आहे.

जाहिरात
0206

प्रभास अभिनेत्री अनुष्का शेट्टीसह नाही तर दुसऱ्याच मुलीसह विवाहबंधनात अडकणार आहे. ही मुलगी एनआयआर आहे.

जाहिरात
0306

प्रभास आणि अनुष्काची ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत असली तरी लग्नगाठ मात्र तो अनुष्कासोबत नाही तर एनआयआर म्हणजेच अनिवासी भारतीय मुलीसोबत तो विवाहबंधनात अडकणार आहे.

जाहिरात
0406

प्रभासची होणारी पत्नी ही अमेरिकेतील एका सॉफ्टवेअर कंपनीच्या मालकाची मुलगी आहे. त्यांचं लग्न लव मॅरेज नसून अरेंज मॅरेज आहे. प्रभासनं या लग्नाला होकार दिला असल्याची माहिती समोर येत आहे.

जाहिरात
0506

प्रभास सध्या आपल्या आगामी राधे श्याम सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. हा सिनेमा 14 फेब्रुवारीला म्हणजेच व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

जाहिरात
0606

राधे श्याम या सिनेमाच्या प्रदर्शनानंतर प्रभासच्या लग्नाविषयीची घोषणा होणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, या बातमीला अद्याप प्रभास किंवा त्याच्या कुटुंबीयांनी दुजोरा दिलेला नाही.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या