JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / फोटो गॅलरी / PHOTOS: हेमा मालिनींपासून जूही चावलापर्यंत, 'या' अभिनेत्री होत्या विवाहित पुरुषांवर फिदा

PHOTOS: हेमा मालिनींपासून जूही चावलापर्यंत, 'या' अभिनेत्री होत्या विवाहित पुरुषांवर फिदा

मुंबई 9 फेब्रुवारी : असं म्हणतात ना की प्रेमाला कुठल्याही बंधनाची पर्वा नसते. हेच वाक्य खरं होताना बॉलिवूड कलाकारांच्या रिअल लाईफमध्येही अनेकदा दिसलं. बॉलिवूडच्या अनेक अशा प्रसिद्ध अभिनेत्री आहेत ज्यांना विवाहित पुरुषांवर प्रेम झालं आणि त्यानंतर त्यांनी लग्नगाठही बांधली. या यादीत हेमा मालिनीपासून (Hema Malini) करीना कपूरचंदेखील(Kareena Kapoor) नाव आहे.

0108

हेमा मालिनी (Hema Malini) आणि धर्मेंद्र (Dharmendra) यांची लव्हस्टोरी जवळजवळ सगळ्यांनाच माहिती आहे. यांचं सिनेमांच्या चित्रीकरणादरम्यान एकमेकांवर प्रेम झालं. धर्मेंद्र आधीपासून विवाहित असल्याचं माहिती असूनही त्यांनी एकमेकांवर प्रेम केलं आणि पुढे विवाहबंधनात अडकले. धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीचं नाव प्रकाश कौर आहे.

जाहिरात
0208

बोनी कपूर यांचं श्रीदेवी (Sridevi) यांच्यावर प्रेम होतं. पुढे श्रीदेवीदेखील त्यांच्या प्रेमात पडल्या. 1996 मध्ये या दोघांनीही लग्नगाठ बांधली. त्यांना दोन मुली असून मोठी मुलगी जान्हवी कपूर चित्रपटांमध्ये काम करते. बोनी यांनी श्रीदेवी यांच्याआधी मोना कपूर यांच्यासोबत विवाह केला होता.

जाहिरात
0308

बॉलिवूडचे प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी आपली पहिली पत्नी हनी ईरानी यांच्यासोबत तलाक घेतल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्री शबाना आजमी यांच्यासोबत विवाह केला. दोघंही एकमेकांसोबत खास वेळ घालवत आहेत.

जाहिरात
0408

शिल्पा शेट्टीचं (Shilpa Shetty) नाव खूप अभिनेत्यांसोबत जोडलं गेलं. मात्र, तिनं लग्न उद्योगपती राज कुंद्रासोबत केलं. 2009 मध्ये या दोघांनी लग्न केलं. राजनं शिल्पाच्या आधी कविता नावाच्या एका महिलेसोबत विवाह केला होता. शिल्पासोबत लग्न करण्यासाठी राजनं कविताला घटस्फोट दिला होता.

जाहिरात
0508

रवीना टंडननं (Raveena Tandon) प्रसिद्ध फिल्म डिस्ट्रीब्यूटर अनिल थडानीसोबत 2003 मध्ये लग्न केलं. रवीनासोबत लग्न करण्याआधी अनिलनं आपली पहिली पत्नी नताशा सिप्पीला घटस्फोट दिला.

जाहिरात
0608

करीना कपूरनं सैफ अली खानसोबत लग्नगाठ बांधली. आता करीना दुसऱ्यांदा आई होणार असून त्यांच्या पहिल्या मुलाचं नाव तैमूर आहे. सैफ अली खाननं करीनाच्या आधी अमृता सिंगसोबत लग्नगाठ बांधली होती.

जाहिरात
0708

राणी मुखर्जी (Rani Mukerji) चित्रपट निर्माता आदित्य चोपडाची दुसरी पत्नी आहे. आदित्यचं पहिलं लग्न पायल खन्ना नावाच्या महिलेसोबत झालं होतं. या जोडीची आता एक मुलगी असून तिचं नाव अदिरा असं आहे.

जाहिरात
0808

जूही चावलानं जय यांच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. ती जय यांची दुसरी पत्नी आहे. त्यांना दोन मुलंही आहेत.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या