पिंपरी, 13 नोव्हेंबर : लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या मैत्रिणीवर तरुणाने चाकू हल्ला केला आहे. मैत्रिणीने रिलेशनशीपमध्ये असताना लग्नाला नकार दिल्याच्या रागातून तरुणाने हा हल्ला केला आहे. पिंपरीतील सांगवी इथं हा धक्कादायक प्रकार घडला आहे. मैत्रिणीवर चाकूने हल्ला केल्यानंतर या तरुणाने स्वत:च्या हाताची नस देखील कापली आहे. आमीर मुनशी असं या तरुणाचं नाव असल्याची माहिती आहे. सध्या दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आमीर मुनशी हा आपल्या मैत्रिणीसोबत गेले काही दिवस लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये होता. पण त्यानंतर या तरुणीने आपल्यासोबत लग्न करण्यास नकार दिला, असं म्हणत आमीरने आपल्या मैत्रिणीवर चाकूने वार केले आहेत. तसंच स्वत:च्या हाताची नस कापत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरुन आमीर मुनशी नामक तरुणाविरुद्ध पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकतर्फी प्रेमातून हल्ला करण्यात आल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. पण लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहून नंतर वाद इतका टोक्याला जाण्याची ही घटना आता पिंपरीमध्ये समोर आली आहे. VIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल!