JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / 25 वर्षांची नोकरी, 30 लाखांच्या साड्या; विश्वासघाताची ही कहाणी ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

25 वर्षांची नोकरी, 30 लाखांच्या साड्या; विश्वासघाताची ही कहाणी ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. ही घटना बाराबाजार (Barabazar)पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या रवींद्र सरणी येथील आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पश्चिम बंगाल, 11 डिसेंबर: पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता (Kolkata Crime) येथे एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. एका साडीच्या दुकानात काम करत असताना दुकानातून लाखोंच्या साड्या चोरून विकणाऱ्या कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना बाराबाजार (Barabazar)पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या रवींद्र सरणी येथील आहे. विद्यासागर सिंग (45) असे आरोपीचे नाव आहे. तो बिहारमधील गया येथील रहिवासी आहे. आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. गेल्या 25 वर्षांपासून तो दुकानात काम करत असून नोकरी करत असताना तो लपून- छपून साड्या चोरायचा, असा आरोप आहे. आरोपीनं गेल्या पाच वर्षांत सुमारे 30 लाख रुपये किंमतीच्या साड्या चोरून बाजारात विकल्या. हेही वाचा-  Omicron व्हेरिएंटपासून बचाव करण्यासाठी बूस्टर डोस एकमेव पर्याय?, WHO म्हणत… मिळालेल्या माहितीनुसार, बारा बाजार येथील होजियरी व्यावसायिक अशोक बर्नवाल यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. विद्यासागर सिंग हा गेल्या 25 वर्षांपासून त्यांच्या दुकानात कर्मचारी म्हणून काम करत होता. व्यावसायिकाच्या म्हणण्यानुसार, विद्यासागर त्यांच्या दुकानात काम करण्याव्यतिरिक्त तिथेच झोपत असत. अशा स्थितीत त्यांनी काही दिवसांपूर्वी दुकानातील स्टॉकचे ऑडिट केलं. त्यावेळी लाखो रुपयांच्या साड्या गायब झाल्या असल्याचं समोर आलं. याबाबत विद्यासागर सोबत बोलले असता त्यानं काहीही सांगितलं नाही. व्यावसायिकाच्या तक्रारीवरून कर्मचाऱ्याला अटक यानंतर व्यावसायिकानं विद्यासागरविरुद्ध बाराबाजार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांनी विद्यासागर याला ताब्यात घेऊन चौकशी केली. या चौकशीदरम्यान त्याने साड्या चोरून बाजारात विक्री केल्याचं कबूल केलं. त्याने सांगितले की, तो गेल्या 5 वर्षांपासून साड्या चोरून बाजारात विकायचा, अशा प्रकारे त्याने आत्तापर्यंत 30 लाखांच्या साड्या विकल्या आहेत. हेही वाचा-  बघता बघता गंगा नदीत वाहून गेली संपूर्ण शाळा, VIDEO पाहून येईल अंगावर काटा सध्या पोलीस आरोपीची कसून चौकशी करत असून त्याच्या अन्य साथीदारांचा शोध घेत आहेत. तो बऱ्याच दिवसांपासून साड्या विकण्याचे काम करत असून त्याचं हे चक्र इतर राज्यातही जोडलं गेल्याचा संशय पोलिसांना आहे. याबाबत पोलीस त्याची चौकशी करत असले तरी चौकशीत मोठी टोळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या