JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / रंग बदलणारा स्मार्टफोन! Vivo कंपनी लवकरच आणणार अनोखा मोबाईल

रंग बदलणारा स्मार्टफोन! Vivo कंपनी लवकरच आणणार अनोखा मोबाईल

व्ही 23 प्रो (V23 Pro) नावाचा हा स्मार्टफोन असून, तो लवकरच दाखल होणार असल्याचं वृत्त लीकर्स आणि टिपस्टर्सद्वारे प्राप्त झाले आहे. मात्र व्हिवो कंपनीने (Vivo) अद्याप या स्मार्टफोनबद्दल अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 18 डिसेंबर : कोरोनाचे (Coronavirus Pandemic) सावट थोडेसे हलके झाल्याने आता जगभरात अर्थव्यवस्था (Economy) रूळावर येत आहे. त्यामुळे बाजारपेठाही पुन्हा बहरल्या आहेत. उत्पादक कंपन्यांमध्ये ग्राहकांना आकर्षित करतील अशी उत्पादने दाखल करण्याची चुरस लागलेली आहे. स्मार्टफोनची (Smartphone) बाजारपेठही यात मागे नाही. ग्राहकांना नवनवीन फीचर्स असणारे अत्यधुनिक स्मार्टफोन घेण्याची उत्सुकता असते. त्यामुळे अनेक दिग्गज उत्पादक कंपन्या एकापेक्षा एक अनोखे स्मार्टफोन्स दाखल करत असतात. विशेषत: भारतीय बाजारपेठ (Indian Market) ही मोबाइल हँडसेटची (Mobile Handset) जगातील एक मोठी बाजारपेठ असल्यानं जगभरातील अनेक नामांकित कंपन्या आपली सर्व स्तरातील ग्राहकवर्गासाठीची उत्पादने आणत असतात. सध्या मोबाइल हँडसेटच्या बाजारपेठेत चर्चा आहे ती चिनी स्मार्टफोन निर्माती कंपनी व्हिवोच्या (Vivo) काही सेकंदात रंग बदलणार्‍या (Color Changing Mobile) स्मार्टफोनची. या अनोख्या फोनची व्हिवोचे चाहते आतुरतेनं वाट पाहत असून, येत्या काही आठवड्यांतच हा स्मार्टफोन दाखल होणार असल्याचं वृत्त आहे. झी न्यूज नं याबाबतचं वृत्त दिलं आहे. व्ही 23 प्रो (V23 Pro) नावाचा हा स्मार्टफोन असून, तो लवकरच दाखल होणार असल्याचं वृत्त लीकर्स आणि टिपस्टर्सद्वारे प्राप्त झाले आहे. मात्र व्हिवो कंपनीने (Vivo) अद्याप या स्मार्टफोनबद्दल अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही. हा स्मार्टफोन Geekbenchच्या लिस्टमध्ये दिसला असून, फोनच्या चाचण्या यशस्वी झाल्या असल्याचंही सांगितलं जात आहे. हा स्मार्टफोन पुढील वर्षी म्हणजेच 2022 मध्ये जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात दाखल होण्याची शक्यता आहे. Star Health Insurance IPO मध्ये गुंतवणूकदारांचं 10 टक्के नुकसान, मात्र राकेश झुनझुनवालांनी कमावले 5418 कोटी व्हिवोचा हा स्मार्टफोन एकदम अनोखा आहे कारण हा स्मार्टफोन चक्क त्याचा रंग बदलणारा आहे. त्याकरता कोणतेही इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञान नाही तर एक विशिष्ट प्रकारचे मटेरियल वापरण्यात आले आहे. हे एक रिअॅक्टिव्ह पद्धतीचे मटेरियल असून त्याचा वापर करून याचे बॅक पॅनल बनवण्यात आले आहे. बॅक पॅनलवर सूर्याचा उजेड पडला की याचा रंग बदलणार आहे. व्हिवोने याला ‘चेंजेबल फ्लोराईट ग्लास मटेरियल’ (Changeble Florite Glass Material) असं नाव दिलं आहे, अशी माहिती 91Mobilesने दिली आहे. मुंबईत पुन्हा CNG आणि PNG च्या किंमतीत वाढ; पाहा नवीन दर हा स्मार्टफोन अँड्रॉइड 12 ओएसवर (Android 12 OS) काम करेल. यात 8GB रॅम असून, MediaTek Dimensity 1200 प्रोसेसरवर चालेल. यात तब्बल 64 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे, अशी माहिती टिपस्टर्सकडून मिळाली आहे. अनेक ठिकाणी हा स्मार्टफोन 4 जानेवारी 22 ला दाखल होण्याची शक्यताही टिपस्टर्सनी वर्तवली असून, लवकरच कंपनीही या स्मार्टफोनबद्दल अधिकृत माहिती जाहीर करेल अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे. या वृत्तामुळे व्हिवोच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून, आतुरतेने ते या अनोख्या स्मार्टफोनची वाट पाहत आहे. त्यांची प्रतीक्षा कधी संपते ते बघू या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या