JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / Viral Video: पाहता पाहता तरुणीने स्वत:ला तलावात दिलं झोकून; मागून भावानेही मारली उडी, आणि...

Viral Video: पाहता पाहता तरुणीने स्वत:ला तलावात दिलं झोकून; मागून भावानेही मारली उडी, आणि...

या भीषण घटनेचा एक LIVE VIDEO समोर आला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

भोपाल, 15 मे : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील VIP रोडवरील तलावात एका तरुणीने उडी मारल्यानंतर गोंधळ उडाला. धक्कादायक म्हणजे मागून येणाऱ्या भावानेही तलावात उडी मारली. यादरम्यान गोताखोर बोट घेऊन पोहोचले. तरुणीवर उपचार करण्यासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तलैया ठाण्याचे प्रभारी डीपी सिंह यांनी सांगितलं की, एअरपोर्ट भागात राहणारी निकिता मीनाचं कोणत्या तरी गोष्टीवरुन कुटुंबासोबत वाद झाला होता. या वादानंतर ती आपल्या घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून आली. घरातून बाहेर पडल्यानंतर निकिताचा भाऊ सातत्याने तिचा पाठलाग करीत होता. सिंह यांनी सांगितलं की, तरुणीने जेव्हा VIP रोडवरील तलावार उडी मारल्यानंतर मागून भावानेही उडी मारली. तरुणाला पोहता येत होतं. त्यामुळे त्याने तलावाट उडी मारून बहिणीला वाचवलं. ही सर्व घटना पाहून तत्काळ गोताखोरांची टीम आपल्या बोटीसह घटनास्थळी पोहोचली आणि तलावातून दोघांना बाहेर काढलं.

हे ही वाचा- बाबो! गाडी पडली 25 कोटीला, नंबर प्लेटसाठी 52 कोटींचा खर्च; VIDEO पाहून व्हाल शॉक या घटनेनंतर व्हीआयपी रोडवर गोंधळ उडाला. तेथून जाणाऱ्यांनी या सर्व घटनेचा व्हिडिओ शूट केला. या व्हिडिओमध्ये निकिता तलावात बुडताना दिसत आहे. यादरम्यान तिच्या भावाने तलावात उडी मारली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी निकिता, तिच्या भावाला रुग्णालयात दाखल केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या