बनवारीलाल चौधरी / शरदिंदू घोष (वर्धमान), 12 मे : लग्नसराई म्हंटल की सगळीकडे धामधूम सुरू असते. लग्नातसगळे मोठ्या उत्साहात दंगा मस्ती करत असतात परंतु वधू आणि वर हे नेहमी शांत असतात. परंतु एका लग्नात अजब प्रकार घडल्याने मोठी खळबळ माजली आहे. यामुळे या लग्नात असे काय झाले की ती मुलगी का ओरडली याबाबत सगळे अचंबीत झाले.
सध्या बरोजगारीमुळे सगळ्याला हैराण करून सोडले आहे. 20 ते 35 वयोगटातून तरूण बेरोजगार झाल्यामुळे त्रस्त आहेत. दरम्यान लग्नाच्या स्टेजवरून आपल्या मैत्रिणींसोबत या नववधूने मोठ्या आवाजात आम्ही बेरोजगार आहे आम्हाला नोकरी द्या असे त्या म्हणाल्याने सगळ्यानाच आश्चर्याचा धक्का बसला. ‘आम्हाला नोकरी हवी, नोकरी द्या, ही बेरोजगारीने आमच्या नाकात दम केले आहे. या लग्नाच्या मंडपातून लोकांनी आम्ही आवाहन करत असल्याचे नववधू थेट म्हणाली.
अभया राय असे लग्न करणाऱ्या मुलीचे नाव आहे. 6 मे रोजी बंगालच्या खेजूर येथे राहणाऱ्या अभयाचे रिंटू या मुलासोबत लग्न झाले. तेव्हा अभया आणि तिच्या मैत्रिणींनी सुशिक्षित बेरोजगारांच्या दुरवस्थेवर आंदोलनाच्या स्वरूपात आवाज उठवला. TET 2014 उत्तीर्ण झालेल्या अभयाने लग्नादरम्यान नोकरीसाठी घोषणाबाजी केली.
अभयाने तिची तक्रारीत म्हटली की, 2014 मध्ये टीईटी उत्तीर्ण होऊनही आत्तापर्यंत नोकरी मिळालेली नाही. 2020 पर्यंत नोकऱ्या दिल्या जातील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मात्र नियम अटी उलट्या असल्याने अपात्रांना नोकऱ्या मिळत आहेत आणि पात्रांना आंदोलन करावे लागत असल्यची खंत यामुलीने व्यक्त केली.
वटपौर्णिमासाठी नवीन आणि हटके उखाणे, मैत्रीणीही करतील तुमचं कौतुकमागच्या काही काळापासून या तरूणींनी कोलकाता येथे सातत्याने आंदोलन केले आहे. अनेकवेळा इतर पक्षांच्या नेत्यांनीही त्यांना पाठिंबा दिला आहे. त्यांच्या मागण्यांना विरोधकांनीही पाठिंबा दिला आहे. सरकारने या आंदोलक बेरोजगारांशी काही वेळा चर्चाही केली आहे, मात्र हे प्रकरण सुटलेले नाही. अशा स्थितीत लग्नाच्या टप्प्यापर्यंत पोहोचणारी ही चळवळ तरुणांमध्ये एक मोठे पाऊल मानले जात आहे.