JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / चहलच्या डान्सर पत्नीने लावले छम्मा छम्मावर ठुमके, पाहा VIRAL VIDEO

चहलच्या डान्सर पत्नीने लावले छम्मा छम्मावर ठुमके, पाहा VIRAL VIDEO

या लोकप्रिय डान्सरचा नुकताच आलेला व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतो आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 1 फेब्रुवारी : धनश्री वर्मा (Dhanashree verma) ही क्रिकेटर यजुर्वेन्द्र चहल (cricketer Yazvendra Chahal) यांची पत्नी (wife) आहे. मात्र तिची ओळख केवळ तितकीच नाही. ती एक प्रसिद्ध डान्सर (famous dancer) आहे. तिच्या अदांवर लाखो चाहते फिदा होतात. सोशल मीडियावरसुद्धा धनश्री कायम चर्चेत असते. तिची फॅन फॉलोईंगही (fan following) मोठी आहे. धनश्रीचा व्हिडीओ येताच तिचे चाहते त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडतात. धनश्री वर्मानं नुकताच तिचा एक ताजा व्हिडिओ शेअर केला आहे. यावरही तिला भरभरून लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत. धनश्री या व्हिडिओमध्ये उर्मिला मातोंडकरवर (Urmila Matondkar) चित्रित झालेल्या ‘छम्मा छम्मा…’ गाण्यावर धमाल डान्स करते आहे. हा डान्स धनश्री एका मोकळ्यात मैदानात करताना व्हिडिओमध्ये दिसतं. एकदम दिलखुलास आणि सुंदर हावभावांसह धनश्री डान्स करते आहे. हा व्हिडिओ धनश्रीनं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर (Instagram) शेअर केला आहे. यात तिचा डान्स कुणाचंही लक्ष आकर्षून घेईल असा झाला आहे.

संबंधित बातम्या

व्हिडिओ पोस्ट करताना तिनं कॅप्शनच्या माध्यमातून आपल्या सहकाऱ्यांचंही मनमोकळं कौतुक केलं आहे. धनश्रीनं नुकतंच क्रिकेटर यजुर्वेन्द्र चहल याच्यासह लग्न केलं आहे. तिच्या या लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओजसुद्धा खूप व्हायरल झाले. कुशल डान्सर असलेली धनश्री व्यवसायानं डॉक्टर आहे. मात्र आता तिची ओळख बहुतांश लोकांना एक डान्सर म्हणूनच आहे. मागच्या वर्षी डिसेम्बरमध्ये तिनं यजुर्वेन्द्रसोबत लग्न केलं. इन्स्टाग्रामवर तिचे फॉलोअर्स 20 लाखांहून जास्त आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या