JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / VIDEO : मशिदीचा माइक बंद करायला विसरले मौलवी; रात्रभर नागरिक 'या' आवाजांनी त्रस्त

VIDEO : मशिदीचा माइक बंद करायला विसरले मौलवी; रात्रभर नागरिक 'या' आवाजांनी त्रस्त

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 20 फेब्रुवारी : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल काही सांगू शकत नाही. नुकताच एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. व्हायरल व्हिडिओबद्दल असा दावा केला जात आहे की एक मौलवी मशिदीचे माइक बंद करायला विसरले होते, त्यानंतर रात्रभर लोकांना आवाज येत राहिले. ‘मौलवीसाहेब माइक बंद न करता झोपले’. या मौलवींचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर या चर्चेला उधाण आलं आहे. लोक मीम्स करुन त्याचा आनंद घेत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये हे स्पष्टपणे ऐकू येत आहे की, मौलवी बिनधास्तपणे झोपले आहेत आणि त्यांच्या घोरण्याचा आवाज येत आहे. एक ट्विटर यूजर @ dapakiguy92 याने हा व्हिडिओ शेअर केला आहे. ‘मौलवी साहेब माइक बंद न करता झोपायला गेले होते’ असं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

हे ही वाचा- Oppo चा अनोखा स्मार्टफोन; स्लाईड होऊन सेल्फी कॅमेरा बदलणार त्याची जागा मजेदार मीम्स ही बातमी ट्वीट होईपर्यंत 48 हजाराहून अधिक लोकांनी पाहिली आहे. 900 हून अधिक जणांनी रीट्वीट केली आहे, 2800 हून अधिक लोकांना लाइक केली आहे. लोक मौलवीच्या या व्हिडिओबद्दल मजेदार मीम्स शेअर करीत आहेत. हा व्हिडिओ कुठला आहे ते अद्याप कळू शकलं नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या