JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / VIDEO : कधी पाहिलं नसेल असं दृश्य; आईसाठी चार भावांमध्ये सुरूये वाद, शेवटी...

VIDEO : कधी पाहिलं नसेल असं दृश्य; आईसाठी चार भावांमध्ये सुरूये वाद, शेवटी...

सर्वसाधारणपणे सध्या आई-बाबा त्यांच्या म्हातारपणात मुलांना नको असतात. इथे मात्र वेगळचं दृश्य पाहायला मिळालं.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मध्य प्रदेश, 6 ऑक्टोबर : देशात एकत्र कुटुंब पद्धती मागे पडत चालली आहे. विभक्त कुटुंब पद्धत अधिक पाहायला मिळत आहे. ‘स्पेस हवा’ असं कारण देत पती-पत्नी आई-वडिलांपासून दूर राहणं पसतं करतात. गेल्या काही वर्षांमध्ये तर याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी वृद्धांश्रमांची संख्या मात्र दिवसागणित वाढताना (number of old age homes is increasing day by day) दिसत आहे. उतरत्या वयात आई-वडिलांना एकटेपणात रमावं लागत आहे. लहाणपणी जीव की प्राण वाटणाऱ्या मुलांना मात्र आई-वडिलांचं म्हातारपण काढणं जड जात आहे. ज्यांनी घर उभारलं त्यांनाच घराबाहेर काढून दिलं जात असताना मध्य प्रदेशातील देवास या भागातून एक वेगळंच वृत्त समोर आलं आहे. या घटनेचा एक व्हिडीओ (Viral Video) समोर आला आहे. हे ही वाचा- किंग कोब्राशी खेळणं शेतकऱ्याच्या जीवावर उठलं; अंगाचा थरकाप उडवणारा VIDEO! देवासमधील (madhya pradesh News) एसडीएम कार्यालयाच्या कॅम्पसमध्ये आज चार भावांमध्ये आई कोणासोबत राहणार यावरुन वाद सुरू होता. बराच वेळ हा वाद सुरू होता. तीघे भाऊ एकीकडे आणि चौथा भाऊ एकीकडे असं काहीस चित्र होतं. ही सर्व भावंड आईला स्वत:जवळ ठेवणार यावरुन भांडत होतं. हा वाद इतका वाढला की, शेवटी पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला.

त्यामुळे आईला कोणासोबत राहायचं आहे, हे जाणून घेण्यासाठी आईला पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. शेवटी भावाच्या वादातून असं ठरलं की, ज्याच्यासोबत आईला राहायचं असेल ती त्याच्यासोबतच राहिलं. कोणासोबत राहायचं याचा निर्णय ती स्वत: घेईल असं सांगण्यात आलं. काहींच्या मते संपत्तीसाठी मुलं आईला ठेवण्याचा अट्टहास करीत आहेत. मात्र अद्याप या प्रकरणातील नेमकी माहिती हाती आलेली नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या