JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / लादेनचा मुलगा हमजावर अमेरिकेचं 7 कोटी रुपयांचं इनाम

लादेनचा मुलगा हमजावर अमेरिकेचं 7 कोटी रुपयांचं इनाम

लादेनचा खात्मा करणाऱ्या अमेरिकेला त्याचा मुलगा ठरतोय डोकेदुखी.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 1 मार्च : दहशतवादी ओसामा बिन लादेनचा पाकिस्तानमध्ये घुसून खात्मा करणाऱ्या अमेरिेकेने दहशतवादाविरुद्धच्या कारवाईला पुन्हा जोमाने सुरुवात केली आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानात असलेल्या दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर आता अमेरिका लादेनचा मुलगा हमजा बिन लादेनचा शोध घेत आहे. त्याची माहिती देणाऱ्याला लाख डॉलरचे बक्षीस देण्यात येणार असल्याचे अमेरिकेने जाहिर केलं आहे. अमेरिका गेल्या अनेक वर्षांपासून कुख्यात हमजा बिन लादेनच्या मागावर आहे. अधून मधून हमजाच्या ठावठिकाण्याची माहिती येत असते. सुरुवातीला तो पाकिस्तानात लपून दहशतवादी संघटना मजबूच करण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले जात होते. त्यानंतर तो इराण किंवा अफगाणिस्तानातून दहशतवादी कारवायांवर लक्ष ठेवून असल्याची चर्चा होती. ओसामा बिन लादेनचा खात्मा केल्यानंतर संघटना पुन्हा उभा करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या हमजाला ठार करण्याची अमेरिकेची योजना आहे.

संबंधित बातम्या

याआधी एफबीआयच्या एका माजी एजंटने म्हटलं होतं की, लादेनच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा हमजाने अल कायदाची सूत्रे हाती घेतली असून तो लादेनच्या मृत्यूचा बदला घेण्याच्या इराद्याने दहशतवादी संघटना मजबूत करत आहे. पाकिस्तानमध्ये एबटाबादमध्ये अमेरिकेला हमजा आणि लादेन यांनी एकमेकांना लिहलेली पत्रे मिळाली होती. त्यानंतर 2011 मध्ये अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनला अमेरिकेने ठार केले होते. लादेनचा मृत्यू झाला तेव्हा हमजा 22 वर्षांचा होता. हमजा हा लादेनचा मुलगा असल्याने तो देखील दहशतवादाने प्रेरित आहे. हमजा हा वडिलांच्या दहशतवादी विचारांनाच पुढे नेणारा असल्याचे एफबीआयचे मुख्य तपास अधिकाऱ्यांनी म्हटले होते. SPECIAL REPORT : असा झाला पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड!

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या