मुंबई, 09 जुलै : 12 जुलै रोजी आषाढी एकादशीला विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सपत्नीक 11 जुलै रोजी पंढरीत येत आहेत. त्याच वेळेस शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेही सपत्नीक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. राज्यात पुन्हा एकदा युतीची सत्ता येण्यासाठी मुख्यमंत्री आणि उध्दव ठाकरे हे दोघेही विठुरायाला साकडे घालणार असल्याचे समजते आहे. वारकर्यांचा कुंभमेळा म्हणजे पंढरीची आषाढी यात्रा. 12 जुलै रोजी आषाढी एकादशीचा अविस्मरणीय सोहळा संपन्न होत आहे. सुमारे 15 लाखाहून अधिक भाविक पंढरीत दाखल होतील, अशी शक्यता शासकीय यंत्रणेणे गृहीत धरून नियोजन केले आहे. प्रथेनुसार राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री सपत्नीक विठ्ठल रुक्मिणीची महापूजा करण्याची परंपरा चालत आली आहे. यावर्षी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस हे विठुरायाची आणि रखुमाईची शासकीय महापूजा करणार आहेत. त्याचवेळी प्रथमच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे हे महापूजेला उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पोलीस यंत्रणेने शक्यता पडताळून पाहण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अधिकृत दौरा अद्यापही आला नसून महापूजेसाठी उपस्थित राहण्यासाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकार मंत्री सुभाष देशमुख, सुरेश खाडे, दिवाकर रावते, जयकुमार रावल, बाळा भेगडे, विजय शिवतारे, माजी मंत्री प्रकाश मेहता, हर्षवर्धन पाटील, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंह हे पंढरीत येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, एकीकडे सगळ्या राजकीय पक्षामध्ये विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू आहे तर दुसरीकडे शिवसेना आणि भाजपची युती झाल्यावर मुख्यमंत्री कुणाचा होणार? असा वाद अजुनही पेटत आहे. आता या प्रश्नांवर काही नेत्यांनी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, आज सामनाच्या अग्रलेखातून पुन्हा एकदा ‘आमच ठरलंय’ असं सांगून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना सुनावलं आहे. मुख्यमंत्री भाजपचाच होणार असं सांगणाऱ्या नेत्यांना सामना अग्रलेखातून युतीच्या प्रकृतीस ओरखडा न आणन्याचं बाळकडू ही देण्यात आलं आहे. युतीतल्या मुख्यमंत्रिपदाच्या वादात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनीही उडी घेतली होती. कोण म्हणालं मुख्यमंत्री भाजपचा असणार नाही, असं वक्तव्य दानवेंनी केलं होतं. ते औरंगाबादेत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. तसंच विधानसभेच्या तयारीला लागण्याची भाजपला गरज नसल्याचं यावेळी दानवे म्हणाले. तर भाजपची दारं सगळ्यांसाठी खुली आहेत, येईल त्याला भाजपमध्ये एंट्री असेल, असंही दानवे म्हणाले होते. त्यावर आता पाहुयात सामना अग्रलेखात नेमकं काय म्हटलंय ते… हेही वाचा : टीम इंडियाला ‘हे’ अकरा खेळाडू मिळवून देतील फायनलचे तिकीट सामना अग्रलेख : आमचं खरंच ठरलंय! मुख्यमंत्री आमचाच! महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचा व्हावा, नव्हे तो होईलच; पण हे काही न सुटणारे कोडे नाही. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व आमच्यात जसे ठरले तसेच घडेल व या कोड्याचे आधीच सोडवलेले उत्तर योग्य वेळी बाहेर पडेल. तोपर्यंत भाजप व शिवसेनेच्या मंडळींनी ‘युती’च्या प्रकृतीस ओरखडा न लावता बोलत राहायचे, ‘‘मुख्यमंत्री, आमचाच बरं का! तसे दोघांत ठरले आहे!’’ युती विजयाचा यापेक्षा दुसरा कोणताही ‘फॉर्म्युला’ असूच शकत नाही. रावसाहेब दानवे यांचे आभार तरी किती मानावेत. त्यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपचेही कोडे सोडवले आणि शिवसेनेलाही कोडे सोडवायला मदत केली. मुख्यमंत्री आपलाच! एकदा दोघांचे ठरलंय म्हटल्यावर फुकटचे वाद कशाला? भारताच्या विजयासाठी क्रिकेटप्रेमींकडून प्रार्थना, यासोबत इतर 18 घडामोडींचा आढावा