JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / Uddhav Thackeray : 'एक यादी पाठवून द्या', मनीषा कायंदे प्रकरणावर उद्धव ठाकरेंची शिंदेंना नवी ऑफर

Uddhav Thackeray : 'एक यादी पाठवून द्या', मनीषा कायंदे प्रकरणावर उद्धव ठाकरेंची शिंदेंना नवी ऑफर

Uddhav thackeray on Ekanth shinde : नुकताच आमदार मनीषा कायंदे यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ केला असून त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यावरुन ठाकरेंनी शिंदे गटाला नवीन ऑफर दिली आहे.

जाहिरात

उद्धव ठाकरेंचं शिंदेंना नवी ऑफर

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 19 जून : आज शिवसेनेचा 57 वा वर्धापन दिन आहे. वर्धापन दिनी ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केलं जात आहे. षण्मुखानंद सभागृहात ठाकरे गटाचा वर्धापन दिन पार पडत आहे. वर्धापन दिनी केलेल्या भाषणातून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर तुफान टोलेबाजी केली. ठाकरे गटातील विधान परिषद आमदार मनिषा कायंदे यांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केला आहे. यावरुन उद्धव ठाकरे यांनी नवी ऑफर दिली आहे. ठाकरेंची शिंदे गटाला ऑफर ठाकरेंचा एक एक शिलेदार शिंदे गटाच्या डेऱ्यात दाखल होत आहे. यावरुन उद्धव ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला. ठाकरे म्हणाले, अनेक जण गेले, काल सुद्धा एक जण गेले, जाऊ दे, मागे शिवसेनाप्रमुखांना उदाहरण दिली होती. इकडून कुणी जातं आणि उद्धव ठाकरेंना धक्का, असा काहीही धक्का नाही. जपानमध्ये एखाद्या दिवशी भूकंप झाला नाहीतर धक्का जाणवत नाही. शिवसेना धक्का प्रफू आहे. मागेही सांगितलं होतं, अस्वलाचा एक केस तोडला डोक्याचा, तर अस्वल काही टकला होऊन जात नाही. तुम्ही जे भाडोत्री बिकाऊ आणले असतील ते घेऊन जा. वाचा - ‘याच रिक्षाने तुमच्या मर्सिडीजला खड्ड्यात घातलं, नादी लागू नका’ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार रोज फोन सुरू आहेत, तुम्हालाही येत असतिल. काय करताय? या ना… काय करताय? या ना… गाडायच आहेच, गाडले गेलेत, फक्त जाहिर व्हायचंय. गद्दारांना सांगायचंय, तुम्हीं एवढी तसदी घेऊ नका, माझ्याकडे यादी पाठवा, मी तुम्हांला पाठवुन देतो. नितीन चांगल बोललाय, तुम्ही पीक कापुन नेलं असेलं, पण शेती आमची आमच्याकडे आहे. पीक काढण्याची हिंमत शेतकर्‍यात असते, नांगर त्याच्या हातात असतो, जास्त गडबड कराल तर नांगरुन टाकेन. एक चांगल स्वाभिमानाचं, जिद्दीच, निष्ठेच, हिंमतीच पीक, शिवसेनाप्रमुखांनी जे बियाणं आपल्याला दिलं आहे, ते बोगस नाही, त्याच्या जीवावर पूढची वाटचाल करतोय, असंही ठाकरे म्हणाले. उद्या गद्दार दिन.. : ठाकरे उद्या गद्दार दिन आहे, एक वर्ष होईल गद्दार दिनाला. त्यांनी नाव चोरलं, पक्ष चिन्ह चोरलं माझे वडीलही चोरायला निघाले होते. तरीही अमित शाहांना महाराष्ट्रात येऊन जप करावा लागत आहे. राम मंदिर उभारून तुम्ही क्रेडिट घ्याल, पण उद्धव ठाकरेंचा जप करण्यापेक्षा रामाचा जप करा तो पावेल. फक्त उद्धव ठाकरेंचा जप करत आहात, फक्त एकच उद्धव ठाकरे तुमच्यासमोर बसलेला आहे. लोकांच्या मनातले बाळासाहेब तुम्ही चोरू शकत नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या