JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / वाघाच्या बछड्यामुळे गावकरांच्या नाकी नऊ! वनविभागाचे अधिकारी रात्रभर बसले पण...

वाघाच्या बछड्यामुळे गावकरांच्या नाकी नऊ! वनविभागाचे अधिकारी रात्रभर बसले पण...

या गावातील एका बंद घराच्या छतावर 2 दिवसांपूर्वी एका वाघाचे पिल्लू दिसले होते.

जाहिरात

गावात घुसले वाघाचे पिल्लू

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

गुलशन कश्यप, प्रतिनिधी जमुई, 23 जुलै : बिहार राज्यातील जमुई जिल्ह्यातील एका गावात भीतीचे वातावरण आहे. सोनो पोलीस स्टेशन हद्दीतील अमेथियाडीह या गावातील ही घटना आहे. याठिकाणी वाघाचे पिल्लू दिसल्याने गेल्या ३ दिवसांपासून स्थानिक नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. वनविभागाचे अधिकारी या वाघाच्या पिल्लूला पकडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, अद्याप त्यांना यश आलेले नाही. गावात वाघ दिसल्यानंतर पुढच्याच रात्री वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गावात धाव घेतली. यावेळी त्यांनी वाघाच्या पिल्लूला पकडण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र ते त्यांच्या हाती आले नाही. भागलपूर येथून वनविभागाचे कर्मचारी जमई येथे आले. या वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वाघाच्या पिल्लूला पकडण्यासाठी खास पिंजरा आणि चाऱ्याची व्यवस्था केली. ज्या घराच्या छतावर वाघ दिसत होता, त्या घराच्या छतावर अगदी समोर एक मोठा लोखंडी पिंजरा लावला होता. यामध्ये या वाघाच्या पिल्लाला पकडण्याची योजना होती. त्याच्यासमोर एक छोटा पिंजराही ठेवण्यात आला होता आणि त्यात एक कोकरू ठेवले गेले होते. वाघाचे पिल्लू शिकार पकडायला येताच त्याला पकडले जाईल, अशी योजना आखण्यात आली होती. मात्र, रात्रभर प्रतीक्षा करूनही वनविभागाचे कर्मचारी आणि अधिकारी त्याला पकडू शकले नाहीत.

वनविभागाचे हे कर्मचारी आपल्यासोबत ट्रँक्विलायझर गन घेऊन आले होते. या बंदुकीचा उपयोग प्राण्याला बेशुद्ध करण्यासाठी केला जातो. मात्र, वाघाचे पिल्लू दिसले नाही आणि त्यासाठी वनविभागाचे कर्मचाऱ्यांनी रात्रभर त्याच्यावर निशाणा साधत राहिले. मात्र, आता एकही प्राणी ते पकडू शकणार नाही, असे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी माईकवरून घोषणा करून लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचा इशारा दिला. घराच्या छतावर दिसला होता वाघ - अमेथियाडीह गावात एका बंद घराच्या छतावर 2 दिवसांपूर्वी एका वाघाचे पिल्लू दिसले होते. त्यानंतर गावातील लोकांमध्ये दहशतीचे वातावरण होते. त्यामुळे स्थानिक लोकांनी पोलीस आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनाही याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर त्यांनी वाघाला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते त्याला पकडू शकले नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या