पिंक व्हॉट्सअॅप
मुंबई : व्हॉट्सअॅप हे जगभरात सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेंजर अॅप आहे. या अॅपवरून फेक न्यूज आणि स्कॅमचा प्रसारही खूप होतो. या अॅपचे भारतात कोट्यवधी युजर्स आहेत. त्यामुळे या माध्यमातून लोकांची फसवणूक करणं सायबर गुन्हेगारांसाठी सोपं झालंय. नुकताच व्हॉट्सअॅपवर एक नवीन मेसेज व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये लोकांना ‘पिंक व्हॉट्सअॅप’ डाउनलोड करण्याची लिंक येत आहे. स्कॅमर्स अनेकांना ही लिंक पाठवत आहेत आणि नवीन फीचर्ससह व्हॉट्सअॅपचे नवीन लूक मिळविण्यासाठी त्यांना अॅप डाउनलोड करण्यास सांगत आहेत. मुंबई पोलिसांनी एका अॅडव्हायझरीमधून ‘पिंक व्हॉट्सअॅप’ नावाच्या व्हायरल व्हॉट्सअॅप मेसेजबद्दल लोकांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी अशा कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये व अॅप डाउनलोड करू नये, असंही म्हटलंय. “न्यू पिंक लूक व्हॉट्सॅप विथ एक्स्ट्रा फीचर्स’ याबद्दलची बातमी व्हॉट्सअॅप युजर्समध्ये फिरत आहे. हा एक स्कॅम आहे, यामुळे सॉफ्टवेअरद्वारे तुमचा मोबाइल हॅक होऊ शकतो. भोळ्या युजर्सची फसवणूक करण्यासाठी सायबर गुन्हेगार विविध प्रकारच्या नवीन युक्त्या आणि मार्ग वापरत आहेत. त्यामुळे युजर्सनी जागरुक, सतर्क आणि सावध राहणं आवश्यक आहे,” असं अॅडव्हायझरीमध्ये म्हटलंय.
WhatsApp Features: तुम्हाला माहितीये का WhatsApp च्या या 4 सीक्रेट ट्रिक? अवश्य घ्या जाणूनपिंक व्हॉट्सअॅप स्कॅम म्हणजे काय? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅपवर एक फसवा मेसेज फिरत आहे. मेसेजमध्ये एक अपडेट ऑफर करण्याचा दावा केला आहे, जो प्लॅटफॉर्मवरील लोगोचा रंग बदलेल. या व्यतिरिक्त, ते व्हॉट्सअॅपचा चांगला अनुभव घेण्यासाठी नवीन फीचर्स ऑफर करण्याचा दावा करतो. पोलिसांनी ही फिशिंग लिंक असल्याचं म्हटलंय. त्यावर क्लिक केल्यास ते युजरच्या फोनवर हल्ला करून संवेदनशील माहिती चोरते किंवा स्कॅमरला डिव्हाइसचे रिमोट कंट्रोल देते.
Whatsapp Chat Viral: मला मैत्री करायची… तरुणानं स्कॅमरलाच घडवली अशी अद्दल की…पिंक व्हॉट्सअॅप लिंकवर क्लिक केल्यास काय होतं?
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, - फोटो व कॉन्टॅक्ट नंबरचा गैरवापर होऊ शकतो. - आर्थिक नुकसान होऊ शकतं. - क्रेडेन्शिअलचा गैरवापर होऊ शकतो. -स्पॅम अटॅक - मोबाइल डिव्हाइसवरील नियंत्रण पूर्णपणे गमावणं. ‘द फ्री प्रेस जर्नल’ने पहिल्यांदाच हा विषय रिपोर्ट केला होता. पिंक व्हॉट्सअॅप स्कॅमपासून सुरक्षित कसं राहायचं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, - जर तुम्ही तुमच्या मोबाइलवर बनावट अॅप डाउनलोड केलं असेल तर ते त्वरित अनइन्स्टॉल करा. त्यासाठी सेटिंग्ज > अॅप्स > WhatsApp (गुलाबी लोगो) वर नेव्हिगेट करा आणि ते अनइन्स्टॉल करा. - नेहमी सावधगिरी बाळगा आणि अनोळखी सोर्सकडून प्राप्त झालेल्या लिंकवर क्लिक करू नका. त्याआधी ऑथेंटिसिटी तपासा. - फक्त अधिकृत गूगल प्ले स्टोअर, iOS App Store किंवा अधिकृत वेबसाइटवरून अॅप्स इन्स्टॉल किंवा अपडेट करा. - ऑथेंटिफिकेशन किंवा व्हेरिफिकेशनशिवाय कोणत्याही लिंक, मेसेज इतरांना फॉरवर्ड करू नका. - तुमची खासगी माहिती, लॉगिन क्रेडेन्शियल्स, पासवर्ड, क्रेडिट किंवा डेबिट कार्ड डिटेल्स याबद्दल माहिती ऑनलाइन कोणाशीही शेअर करणं टाळा, कारण त्याचा गैरवापर होऊ शकतो. -सायबर गुन्हेगारांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी त्यांच्या नवनवीन फ्रॉडबद्दल माहिती घेऊन सतर्क राहा.