JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / जास्त वेळ घराबाहेर राहणं ठरू शकतं घातक; हवेतून पसरतोय कोरोनाचा संसर्ग

जास्त वेळ घराबाहेर राहणं ठरू शकतं घातक; हवेतून पसरतोय कोरोनाचा संसर्ग

अमेरिकेच्या रोग प्रतिबंघक केंद्र म्हणजेच सीडीसीने जारी केलेल्या नवा माहितीनुसार हवेतून कोरोना विषाणूंचा संसर्ग अधिक वेगाने होत आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वॉशिंग्टन, 9 मे : घरातून फार वेळ बाहेर राहत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. अमेरिकेच्या रोग प्रतिबंघक केंद्र म्हणजेच सीडीसीने जारी केलेल्या नवा माहितीनुसार हवेतून कोरोना विषाणूंचा संसर्ग अधिक वेगाने होत आहे. त्यामुळे घराबाहेर अधिक वेळ राहणाऱ्या व्यक्तीला संसर्ग होण्याची शक्यता अधिक असल्याचं म्हटलं जात आहे. सीडीसीने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे SARS-CoV-2 तयार होतो. हवेत रुग्ण जेव्हा श्वास घेतो तेव्हा सुक्ष्म कणांच्या मदतीने विषाणू एका व्यक्तीच्या शरीरातून दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करू शकतो. हा विषाणू स्वत:ला परिवर्तित करतो. एकदा शरीरात गेल्यानंतर संपूर्ण शरीरभर त्याचा फैलाव होता. अमेरिकेच्या सीडीसीने केलेल्या संशोधनानुसार श्वास घेताना किंवा बोलताना तोंडातून पडणारे विषाणू हवेत पसरतात आणि दीर्घ काळ सक्रिय असतात. त्यातून विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता बळावते. काही दिवसांपूर्वीच द लँसेंट या वैद्यकीय नियतकालिकेनेदेखील हवेतून कोरोनाचा फैलाव होत असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे कार्यक्रम स्थळं, गर्दी होण्याची शक्यता असल्याच्या ठिकाणांवर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. हे ही वाचा- कर्मचारी झोपल्याचं पाहून भडकले ऊर्जामंत्री; स्वतःच सॅनिटाइज केलं शहर, पाहा VIDEO कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत (Second Wave of Coronavirus) भारताची अधिक हानी झाली आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे शिवाय मृतांची आकडेवारी देखील कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. दररोज साधारण 4 लाखांहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. केंद्र आणि राज्य सरकार ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचा दावा करतंय. मात्र अद्याप परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही. शिवाय लशींचा तुटवडा, ऑक्सिजन-रेमडेसिव्हीरचा तुटवडा आणि काळाबाजार या समस्या आहेतच.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या