मुंबई, 27 मे: दादर इथे शिवाजी पार्क परिसरात पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या 5 दुचाकी मध्यरात्री 1च्या सुमारास जळून खाक झाल्या आहेत. या घटनेनं परिसरात एकाच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तिथल्या नागरिकांनीच ही आग विझवली असून, त्यांनी संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे या आधी काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी 2 दुचाकी जाळल्याचा प्रकार घडला होता. घटनेबाबत शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.