JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / शिवसेना शाखा प्रमुखाकडूनच नगरसेवकावर धारधार शस्त्राने हल्ला

शिवसेना शाखा प्रमुखाकडूनच नगरसेवकावर धारधार शस्त्राने हल्ला

कुर्ला कॅम्प परिसरातील सेनेचा शाखा प्रमुख जितू साळुंखे आणि गणेश पाटील यांच्या साथीदारांनी सेना नगरसेवक विकास पाटील यांच्यावर हल्ला केला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

उल्हासनगर, 18 जून : उल्हासनगर महापालिकेच्या शिवसेना नगरसेवकावर सेनेच्या शाखा प्रमुखानेच धारधार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आलीये. कुर्ला कॅम्प परिसरातील सेनेचा शाखा प्रमुख जितू साळुंखे आणि गणेश पाटील यांच्या साथीदारांनी सेना नगरसेवक विकास पाटील यांच्यावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात नगरसेवक विकास पाटील यांच्या हाताला आणि कानाला दुखापत झाली आहे. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल  करण्यात आले आहे. रविवारी रात्री विकास पाटील हे अंबरनाथ तालुक्यातील जिआयपी धरणाच्या परिसरात एका चारचाकी गाडीतून फिरण्यासाठी आले असता वाटेत आरोपीने विकास यांच्यावर वार करून त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. यात ते जखमी झाले. दरम्यान, पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून गणेश पाटील आणि शाखा प्रमुख जितू साळुंखे याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. मात्र आपल्याला जीवे ठार मारण्याचा प्रयन्त होता असा आरोप विकास यांनी केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या