JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / पैसे कमवले आणि खर्च केले, पण या 5 गोष्टी केल्यात का?

पैसे कमवले आणि खर्च केले, पण या 5 गोष्टी केल्यात का?

Saving and Investment Tips - खर्चच इतका असतो, की पैसे राखून कसे ठेवायचे हा प्रश्न उभा राहतो. त्यासाठीच जाणून घेऊ या काही स्मार्ट गोष्टी-

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 24 जून : असं म्हणतात, वाचवलेला एक रुपया कमाई केलेल्या एक रुपयाप्रमाणेच असतो. अनेकदा लोक कमवत असतात आणि खर्च करत असतात. पण भविष्यासाठी सेव्हिंग कसं करायचं हा प्रश्न त्यांच्या समोर उभा असतो. खर्चच इतका असतो, की पैसे राखून कसे ठेवायचे हा प्रश्न उभा राहतो. त्यासाठीच जाणून घेऊ या काही स्मार्ट गोष्टी- 1. तुमच्या घराचं बजेट अगोदर पक्कं करा - यात सर्व प्रकारची बिलं, ईएमआय, रेशन, फीस आणि रोजचे खर्च यांचा समावेश असतो. तुमच्या कमाईतला मोठा हिस्सा यात जाईल. मग तुम्हाला अंदाज येईल की तुमच्याकडे किती पैसे उरलेत ते. उरलेल्या पैशाचं तुम्हाला प्लॅनिंग करायचंय. World Cup : भारतच होणार जग्गजेता, हा घ्या पुरावा! 2. पैसे जमा करा - ही बचत तुमच्यासाठी खूपच उपयोगी आहे. तुम्ही इन्शुरन्स काढला असेल, क्रेडिट कार्ड असेल, एफडी आणि शेअर बाजारात गुंतवणूक केली असेल. पण तरीही तुम्ही दर महिन्याला तुमच्या कमाईतले काही पैसे इमर्जन्सी फंडात ठेवले पाहिजेत. ही रक्कम तुम्हाला अचानक नोकरी गेली किंवा आजारपणासाठी उपयोगी येऊ शकते. या रकमेला तुम्ही सेव्हिंग अकाउंटमध्ये अशा प्रकारे ठेवा की ते लगेच काढता येऊ शकतील. तुमच्या कमाईतला 10 टक्के हिस्सा असा वेगळा ठेवणं गरजेचं. डॉक्टरांमुळे नाही तर Apple Watchमुळे वाचला जीव 3. हातात असलेल्या पैशाचा उपयोग कधी आणि कसा करायचा? - तुम्ही आर्थिक नियोजन करा. तुमचा महिन्याचा खर्च आणि तुमच्या आनंदासाठी केला जाणारा खर्च याचं प्लॅनिंग करा. लाँग टर्मचे खर्च म्हणजे कार खरेदी करणं, घर खरेदी करणं, लग्न  यासाठी लागणाऱ्या पैशांचं नियोजन करा. अनेक योजनांबद्दल माहिती करून घ्या. कुठेही पैसे गुंतवायचे असतील तर रिटर्नचाही विचार करा. RBIमध्ये 6 महिन्यात दुसरा राजीनामा; विरल आचार्य यांनी पद सोडलं! 4. गुंतवणूक करण्याचं महत्त्व ओळखा - तुमच्या कमाईतला काही हिस्सा गुंतवणुकीसाठी गेला पाहिजे. शेअर बाजार, म्युच्युअल फंड्स, एसआयपीसारख्या स्कीमचा अभ्यास करूनच पैसे गुंतवा. त्यासाठी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. 5. महत्त्वाची गोष्ट - तुमचे खर्च लिहून ठेवा. तुमच्या गुंतवणुकीकडे लक्ष ठेवा. बाजारातल्या चढउतारांचा त्यावर कसा परिणाम होतो, ते बघा.  गॅरंटी, वाॅरंटी, परचेस अशा सर्व रिसिट्सना एकत्र एका फाइलमध्ये ठेवा. घर किंवा कारचा ईएमआय, क्रेडिट कार्डाचं कर्ज या गोष्टी वेळीच हातावेगळ्या करा. शक्यतो जास्ती जास्त कर्ज घेण्याचं टाळा. तुम्ही या काही गोष्टींकडे लक्ष दिलंत तर तुमचं आयुष्य सहज आणि सोपं जाईल. VIDEO : ‘आता माझी सटकली’, बैलाने व्यापाऱ्याला लाथ मारून 8 फूट लांब फेकलं

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या