JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / Puducherry Assembly Elections 2021 : माजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित काँग्रेसच्या बैठकीत राडा, पाहा VIDEO

Puducherry Assembly Elections 2021 : माजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित काँग्रेसच्या बैठकीत राडा, पाहा VIDEO

या बैठकीत एका नेत्याने डीएमके पक्षाचा झेंडा फडकवल्यानं गोंधळ सुरू झाला. यावेळी पदुच्चेरीचे माजी मुख्यमंत्री व्ही नारायणसामी (V Narayanasamy) देखील उपस्थित होते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुदुच्चेरी, 14 मार्च : पदुच्चेरी (Puducherry) काँग्रेस निवडणूक समितीच्या बैठकीमध्ये जोरदार राडा झाला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेस प्रचार समितीची बैठक होती. या बैठकीत एका नेत्याने डीएमके पक्षाचा झेंडा फडकवल्यानं गोंधळ सुरू झाला. यावेळी पदुच्चेरीचे माजी मुख्यमंत्री व्ही नारायणसामी  (V Narayanasamy) देखील उपस्थित होते. या बैठकीतील गोंधळाचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. काँग्रेस निवडणूक समितीच्या बैठकीसाठी कार्यालयाच्या बाहेर अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी देखील तैनात करण्यात आले होते. पण आतमध्ये कार्यकर्त्यांमध्येच ही हाणामारी झाली. पदुच्चेरीतील 30 विधानसभा जागांसाठी 6 एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. काँग्रेस पक्ष 30 पैकी 15 जागा लढवत असून 13 जागा द्रमुक पक्ष लढवत आहे. तर सीपीआय आणि व्हीसीके या मित्रपक्षांना प्रत्येकी एक जागा देण्यात आली आहे. #WATCH | Puducherry: Ruckus ensued during Congress Election Committee meet after a party leader waved DMK Party flag. Former CM V Narayanasamy was also present at the meeting. pic.twitter.com/A71VkQhabK — ANI (@ANI) March 14, 2021 पदुच्चेरीमध्ये मागच्या महिन्यापर्यंत नारायणसामी यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसचं सरकार होतं. मात्र पक्षातील बंडखोरीमुळे नारायणसामी सरकारचा विधानसभेतील विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी पराभव झाला. माजी उपराज्यपाल किरण बेदी आणि  केंद्र सरकारने आपलं सरकार पाडल्याचा आरोप नारायणसामी यांनी केला होता. ( वाचा :  ‘पाच वर्ष द्या, आसाममधील घुसखोरी समाप्त करू’ अमित शहांचं आश्वासन ) यापूर्वी 2016 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं 15 जागा जिंकल्या होत्या. तर त्यांचा मित्रपक्ष असलेल्या द्रमुकने 2 जागी विजय मिळवला होता. भाजपाला मागील निवडणुकीत एकही जागा मिळाली नव्हती. यंदा मात्र पक्षाने विधानसभा निवडणुकीत पूर्ण जोर लावला आहे. कर्नाटकनंतर अन्य दक्षिण भारतामधील राज्यात भाजपाचं सरकार येऊ शकतं असा अंदाज देखील काही निवडणूकपूर्व सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या