JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / नोकरी रेंजरची आणि प्रॉपर्टी करोडोंची, किरकोळ प्रकरणामुळे लाचखोर अधिकारी अडकला जाळ्यात

नोकरी रेंजरची आणि प्रॉपर्टी करोडोंची, किरकोळ प्रकरणामुळे लाचखोर अधिकारी अडकला जाळ्यात

फॉरेस्ट खात्यात नोकरी करणाऱ्या आणि (Police arrested corrupt police officer) कोट्यवधी रुपयांची मालमत्ता असणाऱ्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

इंदूर, 6 ऑक्टोबर : फॉरेस्ट खात्यात नोकरी करणाऱ्या आणि (Police arrested corrupt police officer) कोट्यवधी रुपयांची मालमत्ता असणाऱ्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 36 वर्षांच्या नोकरीत (Gathered cores during his duty) त्याने ही माया जमवली आहे. एका प्रकरणात 20 हजार रुपयांची लाच घेताना त्याला (Caught red handed while accepting bribe) पोलिसांनी रंगेहाथ अटक केली. त्यानंतर त्याच्या मालमत्तेची चौकशी करत असताना पोलिसांना जे काही आढळलं, ते पाहून अधिकारीदेखील चक्रावून गेले. कोट्यवधींची मालमत्ता मध्यप्रदेशच्या इंदूरमध्ये बिहारी सिंहने 1984 साली वनविभागात नोकरीला सुरुवात केली. फॉरेस्ट गार्ड म्हणून रुजू झालेला बिहारी हळूहळू रेंजर पदापर्यंत पोहोचला. या काळात भ्रष्टाचार करून त्याने कोट्यवधींची मालमत्ता गोळा केल्याचं दिसून आलं. इंदूरच्या स्कीम नंबर 140 मध्ये त्याचा दीड कोटी रुपयांचा फ्लॅट आहे. त्याशिवाय आणखी एक घर, 2 लाख रोख आणि 17 गुंठे जमीनही त्याच्या नावावर आहे. त्याशिवाय बिहारीला गाड्यांचीही हौस आहे. बिहारीच्या वेगवेगळ्या बँक खात्यांत किती पैसे आहेत, याचा आर्थिक गुन्हे शाखा शोध घेत आहे. पोलिसांनी दिलेली माहितीनुसार जमीन समतल करण्याचा अर्ज एका नागरिकाने केला होता. त्याला परवानगी देण्यासाठी बिहारीने 20 हजार रुपयांची लाच मागितली. त्या व्यक्तीने लाचलुचपत विभागाकडं याची माहिती दिली. मग विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून बिहारीला अटक केली. बिहारी पुढच्या वर्षी सेवानिवृत्त होणार होता. 10 महिने त्याची नोकरी राहिली होती. हे वाचा - ते आले, बँक लुटली, निघून गेले! एका मिनिटांत लाखोंचा दरोडा हरणांच्या शिकारीतून पैसे जंगलातील हरिणांच्या शिकारीला परवानगी देऊन बिहारीने कोट्यवधी रुपये कमावल्याचा पोलिसांना संशय आहे. जंगलातील वन्य प्राण्यांचं रक्षण करण्याऐवजी त्यांची तस्करी करणाऱ्यांना बिहारी मदत करत असावा, असा अंदाज आहे. लाखोर रुपये किंमत असणाऱ्या अनेक हरणांची तस्करी करून किंवा तस्करीला साथ देऊन त्याने ही माया जमवली असावी, असा अंदाज आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या