चेन्नई येथे 28 जुलै ते 10 ऑगस्ट 2022 या कालावधीत 44 वे बुद्धिबळ ऑलिम्पियाड ( Chess Olympiad 2022 ) होणार आहे. भारत प्रथमच चेस ऑलिंपियाडचे आयोजन करत आहे. पंतप्रधानांच्या हस्ते नुकतेच मशालीचे उद्घाटन करण्यात आले.
४० दिवसांमध्ये ही मशाल ७५ शहरांमध्ये नेली जाईल. प्रत्येक ठिकाणी बुद्धिबळ ग्रँडमास्टर्सना मशाल देण्यात येईल.
30 वर्षानंतर भारतात प्रथमच बुध्दिबळ ऑलिंपियाडचे आयोजन केले जात आहे. या ऑलिपियाडमध्ये 189 देश सहभागी होणार आहेत.
यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या मशालीचे उद्घाटन करण्यासाठी इंदिरा गांधी स्टेडियमवर आले होते.