JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / शवविच्छेदन अहवालानंतर अवनी वाघीण प्रकरणात आणखी एक नवा खुलासा

शवविच्छेदन अहवालानंतर अवनी वाघीण प्रकरणात आणखी एक नवा खुलासा

अवनीने वनअधिकाऱ्यांवर हल्ला केलाच नाही तरीही तिच्यावर गोळ्या घालण्यात आल्या हे नव आणि धक्कादायक सत्य समोर आलं आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

प्रविण मुधोळकर, प्रतिनिधी यवतमाळ, 08 नोव्हेंबर : अवनी वाघिणीचा मृत्यु हा बंदुकीची गोळी लागल्यामुळे अतिरक्तस्त्रावामुळेच झाल्याचा निष्कर्ष न्युज 18 लोकमतच्या हाती लागलेल्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये काढण्यात आला आहे. यवतमाळच्या जंगलातल्या टीवन अर्थात अवनी वाघिणीच्या मृतदेहावर इनकँमेरा पोस्टमाँर्टम करण्यात आलं. यात गोळी शरीराच्या मागून मारल्यात आल्याचा  निष्कर्ष काढण्यात आला आहे. पोस्टमार्टम रिपोर्टमुळे वनविभागाचा खोटारडेपणा उघड झाला असून टीवन अवनी वाघिणीला बेशुद्ध करण्याचे कुठलेही प्रयत्न झाले नसल्याचं पुढे आलं. यवताळच्या राळेगाव जंगल परिसरात 13 लोकांचा जीव घेण्याचा आरोप असणऱ्या अवनी टीवन वाघिणीला गोळ्या घालण्याचे आदेश राज्याचे मुख्यप्रधान वनसंरक्षक ए के मिश्रा यांनी आदेश दिले होते. त्याला वाघप्रेमींनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. अवनी वाघीण प्रकरणाला नवे वळण, शवविच्छेदन अहवालात धक्कादायक बाब उघड यावर सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने अवनीला कुठल्याही परिस्थीतीत थेट गोळ्या घालता येणार नाही. जर बचाव पथकावर तीने हल्ला केला तरच तिला गोळ्या घातल्या जाऊ शकतात, अशी परवानगी वनविभागाला दिली होती. दरम्यान, अवनीला बेशुद्द न करताच थेट गोळ्या घातल्याच पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये उघड झाल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लघन झाल्याचा आरोप करत व्याघ्रप्रेमी आता पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाणार आहेत. वनविभागाने अवनीला वाचवण्यासाठी तिला बेशुद्द करून पकडण्याएवजी थेट वादग्रस्त शिकारी शहाफत अली खान याला बोलावलं आणि त्याच्या मुलाने  अवनीवर गोळ्या चालवल्यानेही अनेक प्रश्न व्याघ्रप्रेमींनी उपस्थित केले आहेत. यातच केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री मनेका गांधी यांनीही अवनीला गोळ्या घातल्याबद्दल राज्याच्या वनविभागावर ही हत्या असल्याचा आरोप करत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा राजीनामा मागितला आहे. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतही चर्चा करणार असल्याचे मनेका गांधी यांनी जाहीर केल होतं. आता पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये अवनीच्या मृत्यूचे कारण हे गोळी लागल्यामुळे झाल्याच पुढे आल्याने वनखात्याचा खोटारडेपणा उघड झाला आहे. त्यामुळे अवनीने वनअधिकाऱ्यांवर हल्ला केलाच नाही तरीही तिच्यावर गोळ्या घालण्यात आल्या हे नव आणि धक्कादायक सत्य समोर आलं आहे. VIDEO : फटाक्याच्या बंदुकीने नाही तर कोल्हापुराच्या सरपंचाने खऱ्या बंदुकीने हवेत केला गोळीबार

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या