S M L

अवनी वाघीण प्रकरणाला नवे वळण, शवविच्छेदन अहवालात धक्कादायक बाब उघड

सर्वोच्च न्यायालयाने अवनी वाघिणीला आधी बेशुद्ध करण्याचे प्रयत्न व्हावे असे सांगितले असतानाही वाघिणीला ठार मारण्यात आले.

Updated On: Nov 8, 2018 08:05 PM IST

अवनी वाघीण प्रकरणाला नवे वळण, शवविच्छेदन अहवालात धक्कादायक बाब उघड


प्रवीण मुधोळकर, प्रतिनिधी



यवतमाळ, 08 नोव्हेंबर : टी-१ अर्थात अवनी वाघिणीला मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. न्यूज१८ लोकमतच्या हाती अवनी वाघिणीचा पोस्टमार्टम रिपोर्ट हाती लागला आहे. या शवविच्छेदन अहवालमध्ये अवनीला बेशुद्ध करण्यात आलंच नव्हतं असं स्पष्ट झालं आहे.



Loading...

यवतमाळच्या राळेगाव मधील जंगलात वनविभागाच्या बचाव पथकाने अवनीला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केलाच नाही. टी वन वाघिणीच्या मृतदेहावर झालेल्या शवविच्छेदनाच्या अहवालात ही बाब आता उघड झाली आहे. वाघिणीला बेशुद्ध करण्यासाठी मारण्यात आलेला डार्ट शरीरात गेलाच नव्हता त्यामुळे अवनीचा मृत्यू गोळी लागल्यानेच झाला असल्याचं या अहवालात स्पष्ट झालं आहे.



विशेष म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाने अवनी वाघिणीला आधी बेशुद्ध करण्याचे प्रयत्न व्हावे असे सांगितले असतानाही वाघिणीला ठार मारण्यात आल्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या अहवालानंतर व्याघ्र प्रेमी सर्वोच्च न्यायालयात वनविभागाच्या विरोधात याचिका दाखल करणार आहे.


विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी अवनी वाघिणीला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न झालाच नाही तर तिली थेट गोळ्या घातल्या याचे पुरावे न्यूज 18 लोकमतच्या हाती लागले होते. अवनीला गोळ्या घातल्यानंतर दोन वनाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या फोनवरील संभाषणातून अवनीला आधी गोळ्या घातल्या गेल्या आणि नंतर बेशुद्ध करण्याच डार्ट तिच्या मृतदेहावर लावल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.


या ऑडिओ क्लिपमध्ये वेटरनरी डॉक्टर्सच्या हवाल्याने वनाधिकारी ही माहिती एकमेकांना देत आहेत. वनविभागाकडून अवनी वाघिणीने वनविभागाच्या बचाव पथकावर हल्ला केल्याने तिला गोळ्या घातल्याचं सांगितलं जात होतं. यवतमाळच्या राळेगावच्या जंगलात अवनी टीवन वाघिणीला वनविभागाच्या रेस्क्यू टीमने गोळ्या घातल्या होत्या. हे संभाषण वन अधिकाऱ्यामध्ये झालं आहे. यात स्पष्टपणे वाघिणीला थेट गोळ्या घातल्याचं हे अधिकारी सांगताहेत.


१३ जणांचा जीव घेतल्याच्या आरोपावरून अवनी वाघिणीला २ नोव्हेंबर रोजी गोळ्या घालून ठार मारण्यात आलं होतं. अवनी वाघिणीला ठार मारण्यात आल्यामुळे वनप्राणी संघटनांनी तीव्र आक्षेप घेतला. सोशल मीडियावर सरकारवर चौफेर टीका होत होती. अशातच केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी अवनीची राज्य सरकारने हत्याच केली असा गंभीर आरोप केला. तसंच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली होती.


सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अवनी वाघिणीला ठार मारण्यात आल्याबद्दल स्पष्टीकरण दिलं होतं. ते म्हणाले होते की, "सुप्रीम कोर्टाने अवनी वाघिणीला ठार मारण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर वनविभागाने कारवाई सुरू केली होती. गेल्या अनेक दिवसांपासून अवनी वाघिणीचा शोध घेतला जात होता. वाघिणीला ठार मारण्याच्ाय दोन दिवसांआधी एका गावकऱ्याने टी-१ वाघीण दिसल्याची माहिती दिली आणि शोध मोहीम सुरू झाली. ट्रॅक्युलाईझ केल्यानंतर वाघीण लगेच गुंगीत जात नाही कारण डोस कमी द्यावा लागतो. अशात वाघिणीने जिप्सीवर हल्ला केला आणि नाईलाजाने तिला ठार करावं लागलं असं मुनगंटीवार यांनी सांगितलं होतं.



==============================







बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 8, 2018 07:36 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

  • I agree to receive emails from NW18

  • I promise to vote in this year's elections no matter what the odds are.

    Please check above checkbox.

  • SUBMIT

Thank you for
taking the pledge

Vote responsibly as each vote
counts and makes a difference

Click your email to know more

Disclaimer:

Issued in public interest by HDFC Life. HDFC Life Insurance Company Limited (Formerly HDFC Standard Life Insurance Company Limited) (“HDFC Life”). CIN: L65110MH2000PLC128245, IRDAI Reg. No. 101 . The name/letters "HDFC" in the name/logo of the company belongs to Housing Development Finance Corporation Limited ("HDFC Limited") and is used by HDFC Life under an agreement entered into with HDFC Limited. ARN EU/04/19/13618
T&C Apply. ARN EU/04/19/13626

Live TV

News18 Lokmat
close