मुंबई, 26 मे- राजकीय क्षेत्रापासून ते चित्रपटगृहापर्यंत सगळीकडेच नरेंद्र मोदींच्याच नावाची चर्चा आहे. नुकतीच नरेंद्र मोदींच्या भारतीय जनता पक्ष बहूमताने विजयी झाला. तर दुसरीकडे अभिनेता विवेक ओबेरॉयचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित बायोपिक रिलीज झाला. सिनेमा पाहण्यासाठी अनेकांनी सिनेमागृहात गर्दी केली होती. गेल्या अनेक दिवसांपासून सिनेमाच्या प्रदर्शनावर प्रश्न उपस्थित केले जात होते. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर आता पहिल्या दिवसाचे आकडे समोर आले आहेत. प्लॅस्टिक सर्जरीनंतर या अभिनेत्रींचा चेहराच बदलला, त्यांना पाहिल्यावर तुम्हीही घाबराल! रिपोर्ट्सनुसार, सिनेमा पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी चांगली कमाई करू शकतो. दुसऱ्या दिवशी सिनेमा किमान तीन कोटींची कमाई करू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे. सिनेव्यापारविश्लेषक तरण आदर्शने ट्वीट करत पहिल्या दिवसाची कमाई सांगितली. या बायोपिकने पहिल्या दिवशी 2.88 कोटींची कमाई केली. सिनेमाला पूर्णपणे मोदी लहरीचा फायदा मिळत आहे.
ज्युनिअर एनटीआरचं मूळ नाव वाचून तुम्हीही व्हाल हैराण, जाणून घ्या त्याच्याशी निगडीत या 5 गोष्टी रिलीजपूर्वी सिनेमाबद्दल अनेक कॉन्ट्रोव्हर्सीही झाल्या होत्या. निवडणूक आयोगाने या सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घातली होती. निवडणुकांचे निर्णय आल्यानंतरच सिनेमा प्रदर्शित करण्याचे आदेश देण्यात आले होते. एकीकडे या सिनेमाला अजय देवगणचा दे दे प्यार दे आणि अर्जुन कपूरचा इंडियाज मोस्ट वॉन्टेड सिनेमांची तगडी स्पर्धा असतानाही मोदी बायोपिक चांगली कमाई करत आहे. Bharat Dairies- कतरिना कैफचं हे हॉट साडी फॅशन स्टेटमेंट तुम्हीही करू शकता फॉलो सिनेमाची कथा नक्की आहे तरी काय- मोदींच्या या सिनेमाची कथा चहा विकण्यापासून सुरू होत देशसेवा करत पंतप्रधान होण्यापर्यंतची आहे. सिनेमाच्या कथेचा शेवट २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी समारोहाने होतो. सिनेमात जरीना वहाब, बरखा सेनगुप्ता, बोमन इराणी, मनोज जोशी, राजेंद्र गुप्ता यांसारखे कलाकार आहेत. एकीकडे प्रेक्षकांना हा सिनेमा आवडत असला तरी समीक्षकांकडून सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाला नाही. सोशल मीडियावर आपल्या या एक्स गर्लफ्रेंडला फॉलो करतो रणबीर कपूर