न्यायाधीशाच्याच घरात हुंडाबळी, 15 लाखांसाठी विवाहितेचा छळ

गुन्हा दाखल होताच सर्व सात आरोपी फरार झाले. पीडितेचा सासरा वकील असून अन्य एका दिराने न्यायाधीशाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

Sachin Salve
नांदेड,22 जून : हुंडयासाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी एकाच कुटुंबातील तीन न्यायाधीशांसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाला.नांदेड येथील रहिवाशी शेख वसीम अक्रम या 28 वर्षीय तरुण न्यायाधीशाचा विवाह मुंबई येथील तरुणीशी डिसेंबर 2016 साली झाला. सासरच्यानी पंधरा लाख रुपये हुंडा मागितला होता. लग्नापूर्वी आणि नंतरही न्यायाधीश पती शेख वसीम अक्रम, न्यायाधीश दीर शेख अमीर, न्यायाधीश नंदवई शेख जावीद सिद्दिकीसह सासु ,सासऱ्यांनी हुंडयासाठी विवाहितेचा छळ सुरू केला.

शिवाय दोन दिरांनी विनयभंग केल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटलंय. पीडितेच्या फिर्यादीवरुन इतवारा पोलिसांनी हुंडयासाठी छळ करणे, मारहाण करणे, बळजबरी दागिने हिसकावणे आणि विनयभंग या कलमान्वये गुन्हा दाखल केलाय. गुन्हा दाखल होताच सर्व सात आरोपी फरार झाले. पीडितेचा सासरा वकील असून अन्य एका दिराने न्यायाधीशाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

Trending Now