ठाणे, 25 जुलै : मराठा आंदोलनामुळे काल मराठवाडा, विदर्भ, आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग ठप्प होता. पण या आंदोलनाची झळ आज मुंबईला बसणार आहे. दरम्यान ठाण्यात सकाळपासूनच्या शांततेनंतर आता मराठा मोर्चेकरी रस्त्यावर उतरले आहेत. ठाण्याच्या तीन हात नाका ते ज्ञानसाधना कॉलेज रोड आंदोलनकर्त्यांकडून जाम करण्यात आला आहे. मोठ्या संख्येने मोर्चेकरी रस्त्यावर उतरले आहे. त्यामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. मोर्चेकरांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. या सगळ्या अंदाज घेत पोलिसांचा मोठा ताफा जागोजागी तैनात केला आहे. पण मोर्चेकरांच्या गर्दीने ठाणे पूर्व मार्ग पूर्णपणे जाम झाला आहे. मराठा आरक्षण चिघळलं, मराठा क्रांती मोर्चाकडून आज मुंबई बंद या सगळ्याचा त्रास मात्र सर्वसामान्य जनतेला, चाकरमान्यांना आणि विद्यार्थांना होत आहे. आज मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगडमध्ये आंदोलकांकडून बंदची हाक देण्यात आलीय. सकल मराठा समाजाच्या वतीने मुंबईत आयोजीत बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान येत्या 9 ऑगस्टला आंदोलकांकडून ठोक आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांच्याकडून देण्यात आला. नवी मुंबई येथील घणसोली येथे आज पहाटे दोन बेस्ट बसवर दगडफेक झाल्यामुळे ऐरोली ते वाशीपर्यंतची बेस्ट सेवा पूर्ण बंद करण्यात आली आहे. त्यामुळे नवी मुंबईत जाण्यासाठी ठाणे- वाशी रेल्वेने प्रवास करणं सोयीस्कर ठरणार आहे. नवी मुंबईतील अनेक शाळा कॉलेजमधील मुलांना कोणतीही पूर्व कल्पना न देता घरी पाठवण्यात आले. या सगळ्या गदारोळात सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. हेही वाचा…
भिवंडी 3 मजली इमारतीचा भाग कोसळला, 5 बचावले पण 1 महिलेचा मृत्यू पाकिस्तानात पंतप्रधानांच्या गादीवर कोण बसणार? आज मतदानाला सुरूवात